Vizag Gas Leak: विशाखापट्टणममध्ये गॅसगळतीमुळे हाहाकार, पाहा अंगावर शहारे आणणारी छायाचित्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 02:09 PM2020-05-07T14:09:02+5:302020-05-07T14:36:07+5:30

आज आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे विषारी गॅस गळतीमुळे भीतीचे वातावरण पसरले. या गॅस गळतीमुळे शहरात आतापर्यंत ८ ते १० जणांच्या मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. तसेच हजारो नागरिक आजारी पडले आहे.

आज आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे विषारी गॅस गळतीमुळे भीतीचे वातावरण पसरले. या गॅस गळतीमुळे शहरात आतापर्यंत ८ ते १० जणांच्या मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. तसेच हजारो नागरिक आजारी पडले आहे.

विशाखापट्टणममधील विशाखा एलजी पॉलिमर कंपनीतून स्टीरीन नावाचा विषारी वायू लिक झाला. या विषारी वायूच्या गळतीमुळे आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टम शहरात हाहाकार माजला आहे.

विषारी वायूच्या प्रभावामुळे कंपनीच्या आसपासच्या परिसरातील लोक श्वास कोंडून जागोजागी बेशुद्ध होऊन पडू लागले.

या गॅसगळतीमुळे मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास झाला. जवानांकडून युद्धपातळीवर प्रयत्न करून त्यांना सुरक्षित ठिकाणी तसेच रुग्णालयात हलवण्यात येत होते.

स्थानिक प्रशासन आणि नौदलाच्या जवानांनी तातडीने मदतकार्य सुरू करून स्थानिकांना प्रभावित भागातून बाहेर काढले.

गॅस लीक झाल्यानंतर कंपनीच्या आसपासच्या परिसरामध्ये प्रशासनाकडून स्वच्छतेचे आपातकालीन काम सुरू केले.

सुमारे तीन किलोमीटरच्या परिसरात या वायू गळतीचा प्रभाव दिसून आला. दरम्यान, बेशुद्ध पडलेल्या लोकांना जवान असे उचलून सुरक्षित ठिकाणी नेत होते.

विशाखापट्टणममधील याच विशाखा एलजी पॉलिमर कंपनीतून विषारी गॅस लीक झाला