MSP : मोदी सरकारचं देशातील शेतकऱ्यांना खास बक्षीस, घेतला मोठा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 05:09 PM2021-06-09T17:09:56+5:302021-06-09T17:21:41+5:30

नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, शेती फायदेशीर व्हावी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी एका पाठोपाठ एक निर्णय घेण्यात आले. (Union agriculture minister Narendra Singh Tomar )

मोदी सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना दिलासा देत खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी यासंदर्भात माहिती दिली. (Union agriculture minister Narendra Singh Tomar says cabinet hikes paddy MSP by RS 72)

तोमर म्हणाले, तांदूळ पिकावरील एमएसपीमध्ये 72 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यानंतर आता तांदळाची किंमत 1868 रुपये प्रति क्विंटलवरून 1940 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचली आहे. याच बरोबर, बाजरीवरील एमएसपीदेखील 2150 रुपये प्रतिक्विंटलवरून 2250 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आली आहे.

कृषि मंत्री म्हणाले, शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे आणि ते आनंदात राहावेत, यासाठी गेल्या 7 वर्षांत शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. 2018 पासून एमएसपी खर्चावर 50% नफा जोडून घोषित करण्यात येते.

शेती फायदेशीर व्हावी, यासाठी आम्ही काम केले आहे - तोमर नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, शेती फायदेशीर व्हावी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी एका पाठोपाठ एक निर्णय घेण्यात आले.

शेतकऱ्यांच्या खरिपातील पिकांसाठी एमएसपीचा निर्णय घेण्यात आला आहे. तांदूळ, बाजरी आणि तूरीच्या MSP मध्ये वाढ करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी रिफॉर्मच्या बाबतीत चर्चा झाली होती. तेव्हा, एमएसपीसंदर्भातही चर्चा झाली होती. तेव्हाही आम्ही म्हणालो होतो, MSP आहे आणि येणाऱ्या काळातही सुरूच राहणार. यानुसार, सरकारने MSP ची घोषणा केली आहे, असेही तोमर म्हणाले.

तोमर म्हणाले, नवीन कृषी कायदे आणण्याची देशातील सर्वच पक्षांची इच्छा होती. मात्र, त्यांची हिम्मत झाली नाही. भारत सरकारने शेतकऱ्यांसोबत 11 वेळा चर्चा केली. मात्र, यासंदर्भात ना कुण्या शेतकरी संघटनेने उत्तर दिले, ना कुण्या पक्षाने उत्तर दिले. यामुळे चर्चा पुढे सरकू शकली नाही.

शेतकरी चर्चेसाठी जेव्हा पुन्हा तयार होतील, तेव्हा आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असेही तोमर यांनी यावेळी सांगितले.

देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसण्यासाठी वचनबद्ध मोदी सरकार... असे ट्विट करत, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी MSP घोषित करण्यात आलेल्या खरीप पिकांची ही यादी पोस्ट केली आहे.