ही आहेत भारतातील सर्वात श्रीमंत राज्ये, महाराष्ट्राचा क्रमांक कितवा? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 12:28 PM2020-01-06T12:28:38+5:302020-01-06T12:54:23+5:30

भारतामध्ये अनेक बाबतीत विविधता आढळून येते. सामाजिक सांस्कृतिक बाबतीतील विविधतेबरोबरच भारतातील राज्यांमध्ये आर्थिक क्षेत्रातही असमानता आहे. त्यामुळे देशातील काही राज्ये खूप श्रीमंत आहेत, तर काही राज्ये गरीब आहेत. आज जाणून घेऊया, देशातील श्रीमंत राज्यांविषयी.

देशातील सर्वात श्रीमंत राज्यांच्या यादीत केरळ दहाव्या क्रमांकावर आहे. केरळचा एकूण जीडीपी 8.76 लाख कोटी आहे.

सर्वात श्रीमंत राज्यांमध्ये राजस्थानचा नववा क्रमांक लागतो. राजस्थानचा एकूण जीडीपी 9.29 लाख कोटी एवढा आहे.

देशातील सर्वात श्रीमंत राज्यांच्या यादीत तेलंगणा आठव्या क्रमांकावर आहे. तेलंगणाचा एकूण जीडीपी हा 10.49 लाख कोटी एवढा आहे.

10.49 लाख कोटी जीडीपीसह आंध्र प्रदेश सर्वात श्रीमंत राज्यांच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे.

पश्चिम बंगाल हे देशातील सहव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत राज्य आहे. पश्चिम बंगालचा एकूण जीडीपी 13.14 लाख कोटी रुपये एवढा आहे.

सर्वात श्रीमंत राज्यांच्या सूचीत गुजरात पाचव्या क्रमांकावर आहे. गुजरातचा एकूण जीडीपी 14.96 लाख कोटी रुपये एवढा आहे.

उत्तर प्रदेश हे देशातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत राज्य आहे. उत्तर प्रदेशचा एकूण जीडीपी 15.80 लाख कोटी रुपये एवढा आहे.

देशातील सर्वात श्रीमंत राज्यांच्या यादीत कर्नाटक हे तिसऱ्या क्रमांकावरील राज्य आहे. कर्नाटकचा एकूण जीडीपी 15.88 लाख कोटी रुपये एवढा आहे.

तामिळनाडू हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत राज्य आहे. तामिळनाडूचा एकूण जीडीपी हा 17.25 लाख कोटी एवढा आहे.

देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे ते म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्राचा जीडीपी हा तब्बल 27. 96 लाख कोटी एवढा आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या तामिळनाडूपेक्षा महाराष्ट्राचा जीडीपी तब्बल 10.71 लाख कोटी रुपयांनी अधिक आहे. तर या यादीत दहाव्या क्रमांकावर असलेल्या केरळपेक्षा महाराष्ट्राचा जीडीपी तिप्पट अधिक आहे.