ही आहेत भारतातील सर्वात प्रदूषित शहरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 11:45 PM2019-10-31T23:45:49+5:302019-10-31T23:55:47+5:30

गेल्या काही काळात भारतमध्ये प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे भारतातील अनेक शहरांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. आज आपण आढावा घेऊया देशाती सर्वात प्रदूषित असलेल्या 10 शहरांचा.

गाझियाबाद हे देशातील सर्वात प्रदूषित शहर आहे. येथील एक्यूआय 478 इतका होता.

हरयाणातील पानीपत हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे.

दिल्लीपासून जवळ असलेले हरयाणामधील वल्लभगड हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे.

उत्तर प्रदेशमधील बागपत हे शहर देशातील सर्वाधिक प्रदूषित असलेले चौथ्या क्रमांकाचे शहर आहे.

बेगाने विकसित होत असलेले नोएडा हे देशातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे

ग्रेटर नोएडा सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे

उत्तर प्रदेशमधील हापूड शहर प्रदूषित शहरांमध्ये सातव्या क्रमांकावर आहे.

उत्तर प्रदेशमधील मीरत हे शहर प्रदूषित शहरांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे

मुझफ्फरनगर सर्वाधिक प्रदूशित शहरांधमध्ये नवव्या क्रमांकावर आहे

राजधानी दिल्ली देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे.