श्रीनगरमध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी, रस्त्यांवर मखमली चादर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 03:01 PM2017-12-12T15:01:39+5:302017-12-12T15:05:27+5:30

जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षातील थंडीच्या मोसमातील पहिली बर्फवृष्टी आज झाली.

मोठ्या प्रमाणावर झालेल्या या बर्फवृष्टीमुळे रस्त्यांवर, झाडांवर, घरांवर सर्वत्र बर्फाची जणू मखमली चादर पसरल्याचे चित्र दिसत आहे.

मोठ्या प्रमाणावरील बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्गही काही काळासाठी बंद ठेवण्यात आला आहे.

बर्फवृष्टीचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये मोठा उत्साह असून बर्फात खेळण्याचा ते आनंद ते लूटत आहेत.