Shocking: ही कसली डील? लग्नाच्या १७ दिवसांनी पत्नीला प्रियकराच्या हवाली केले, अ‍ॅग्रिमेंटही केले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 09:54 PM2021-07-21T21:54:00+5:302021-07-21T21:59:08+5:30

Marriage story: जेव्हा मुलाकडच्या मंडळींना आपली सून दुसऱ्याच मुलासोबत बोलते, प्रेम करते तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.

प्रेम आंधळे असते म्हणतात. याचे जिवंत उदाहरण रांचीमध्ये पहायला मिळाले आहे. जेव्हा एक नववधू लग्नाच्या 17 दिवसांनंतर पतीला सोडून प्रियकराकडे गेली. प्रियकरही लग्न झालेल्या प्रेयसीला सोबत ठेवण्यास लगेच तयार झाला. या तरुणीचे लग्नाआधी एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. तरीही घरच्यांनी तिचे लग्न जबरदस्तीने लावून दिले होते. लग्नानंतर देखील ती प्रियकराच्या संपर्कात होती.

जेव्हा मुलाकडच्या मंडळींना आपली सून दुसऱ्याच मुलासोबत बोलते, प्रेम करते तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. यानंतर नातेवाईकांनी आपापसात प्रकरण मिटवून एक अॅग्रीमेंट बनविले. यानंतर पती स्वत: त्याच्या पत्नीला तिच्या प्रियकराकडे सोडून आला.

प्रियकराच्या आईला या दोघांचे लफडे माहिती होती. यामुळे या दोघांचे पुन्हा लग्न लावून देण्यात आले. हे प्रकरण सुखदेवनगर पोलीस ठाणे क्षेत्रातील आहे. तीन जुलैला चिपरा गावातील तरुणाचे लग्न झाले होते.

काही दिवसांतच हे लग्न मोडायला आले. मुलीकडच्या आणि मुलाकडच्या लोकांनी बसून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतू तो असफल ठरला.

लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी नववधू प्रियकराकडे पळून गेली. यामुळे सासरकडची मंडळी धक्क्यात गेली. कसेबसे तिला 19 जुलैला परत आणले. मात्र, ती नवऱ्यासोबत राहण्यास तयार नव्हती.

भांडण काढायला लागली. यामुळे त्या तरुणाने देखील तिच्यासोबत राहण्यास नकार दिला आणि वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही मोठा निर्णय घेणे भाग पडले. सूनेला तिच्या प्रियकरासोबत राहण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. 20 जुलैला रातूच्या पोलीस ठाण्यात तिच्या प्रियकराला बोलावण्यात आले.

यानंतर वरपक्षाकडून पत्नी आणि तिच्या प्रियकराबरोबर एक करार करण्यात आला. या मध्ये पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत राहण्याची परवानगी दिली.

गेल्या दीड वर्षापासून आपले प्रेमसंबंध असल्याचे तिच्या प्रियकराने सांगितले. याची माहिती मुलीच्या कुटंबीयांनाही होती. हे माहिती असूनही त्यांनी तिचे लग्न दुसऱ्याच मुलाशी लावून दिले.

प्रियकराच्या जबाबानुसार मुलीच्या आईला त्यांचे लफडे माहिती होते. तरीही त्यांनी तिचे लग्न लावून दिले. जेव्हा याची वाच्यता झाली तेव्हा एक करार करून त्यानुसार प्रेयसीला माझ्या ताब्यात देण्यात आले. मी प्रेम केले आहे, कोणत्याही परिस्थितीत ते निभावेन. (सर्व फोटो संग्रहित, प्रतिकात्मक)

टॅग्स :लग्नmarriage