आता पासपोर्ट तयार करण्यासाठी DigiLocker ची लिंकही देता येणार; लवकरच रोलआऊट होणार e-passport

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 09:30 AM2021-02-21T09:30:02+5:302021-02-21T09:38:35+5:30

पाहा कसं तयार कराल DigiLocker अकाऊंट आणि अपलोड कराल डॉक्युमेंट्स

आता पासपोर्ट तयार करणं आणखी सोपं झालं आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या डॉक्युमेंट्सची फिजिकल कॉपी घेऊन जावी लागणार नाही. याऐवजी आता तुम्हाला DigiLocker मध्ये अपलोड केलेले डॉक्युमेंट्सची लिंकही देता येईल.

परराष्ट्र मंत्रालयानं नागरिकांच्या सोयीसाठी आणि पासपोर्ट सुविधा पेपरलेस करण्यासाठी ही सुविधा सुरू केली आहे. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधर यांनी शुक्रवारी या नव्या सेवेची सुरूवात केली.

या सेवेचा वापर करून आता भारतातील कोणत्याही ठिकाणाहून पासपोर्टसाठी अर्ज करता येणार आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये पासपोर्ट सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे.

या व्यतिरिक्त परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार लवकरच ई-पासपोर्ट सुविधाही लाँच करण्याची योजना तयाक करण्यात आली आहे. तसंच यामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षा मिळणार असून परदेशी विमानतळांवर इमिग्रेशन प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

मंत्रालयानं आपल्या आगामी Passport Seva Programme V2.0 या योजनेत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, चॅटबॉट्स, रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशनसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे.

या तंत्रज्ञानाचा सहाय्यानं लोकांना अधिक प्रभावी पद्धतीनं आणि सहजरित्या पासपोर्ट सेवांची डिलिव्हरी केली जाणार असल्याचंही सांगण्यात आलं.

DigiLocker हा एकप्रकारचा व्हर्च्युअल लॉकर आहे. ज्यामध्ये तुम्हाला एज्युकेशनल सर्टिफिकेट्स, ड्रायव्हिंग लायसन्स, जन्माचं प्रमाणपत्र, पासपोर्ट, लाइफ इंश्योरन्स पॉलिसी, हेल्थ पॉलिसी अथवा मोटर पॉलिसी, पॅन कार्ड, वोटर आईडी सहित पॉलिसी डॉक्युमेंट्स अशी अनेक महत्त्वाची कागदपत्रे डि़जिटली सेव्ह करता येतात.

जुलै २०१५ मध्ये नागरिकांसाठी DigiLocker ची सेवा सुरु करण्यात आली होती. यामध्ये नागरिकांना १ जीबी पर्यंतच्या स्पेसचा वापर करता येतो.

हा DigiLocker आधार क्रमांकाशी लिंक असतो. यामुळे देश पेपरलेस गव्हर्नन्स मार्गावर पुढे जात आहे.

DigiLocker च्या मदतीनं तुम्हाला कोणत्याही ठिकाणी कोणतंही डॉक्युमेंट फिजिकली नेण्याची गरज नाही. या माध्यमातून तुम्ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं तुमची डोक्युमेंट्स शेअर करू शकता.

DigiLocker मध्ये डॉक्युमेंट्स सेव्ह करण्यासाठी सर्वप्रथम ती स्कॅन करावी लागतील. याव्यतिरिक्त त्यांचा फोटो घेऊनही ते फोटो DigiLocker मध्ये सेव्ह करता येतात.

याशिवाय DigiLocker त्याबद्दल काही संक्षिप्त माहिती लिहिण्याचीही सुविधा देण्यात आली आहे. त्याचाही मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.

DigiLocker सुरू करण्यासाठी digitallocker.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. तसंत तुमचा फोन गा आधार कार्डासह लिंक आहे का नाही याचीदेखील पडताळणी करावी लागेल.

जर तुमचा फोन क्रमांक आधार क्रमांकाशी रजिस्टर नसेल तर तुम्हाला या सुविधेचा वापर करता येणार नाही.

यानंतर त्या ठिकाणी असलेल्या साईन अप या बटनावर क्लिक करा. त्या ठिकाणी विचारण्यात आलेलं नाव, जन्म तारीख, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि तुम्ही तयार केलेला पासवर्ड टाका.

यानंतर १२ अंकी आधार कार्ड क्रमांक एन्टर करा. आधार क्रमांक एन्टर केल्यानंतर दोन पर्याय मिळतील. त्यातील पहिला म्हणजे ओटीपी आणि दुसरा म्हणजे फिंगरप्रिन्ट. यापैकी कोणत्याही पर्यायाचा तुम्ही वापर करू शकता.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला युझरनेम आणि पासवर्ड टाकायला सांगितला जाईल. त्याच्या मदतीनं तुम्ही digiLocker लॉग इन करू शकाल. DigiLocker लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या वैयक्तीक खात्यात दोन सेक्शन दिसतील.

पहिल्या सेक्शनमध्ये तुम्हाला निरनिराळ्या संस्थांद्वाके जारी करण्यात आलेली सर्टिफिकेट्स, त्यांच्या लिंक, जारी केल्याची तारीख आणि ते शेअर करण्याचा पर्याय मिळेल.

दुसऱ्या सेक्शनमध्ये तुम्हाला अपलोड करण्यात आलेले सर्टिफिकेट, त्यांची माहिती, शेअर आणि साईन इनचा पर्याय असेल. तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य तो पर्याय निवडा.

जर तुम्ही कोणतं सर्टिफिकेट अपलोड करू पाहत असाल तर माय सर्टिफिकेटवर क्लिक करा. त्यानंतर डॉक्युमेंट अपलोडवर क्लिक करून तुमचं सर्टिफिकेट निवडा. यानंतर त्यात विचारण्यात आलेली माहिती भरा. अशा प्रकारे तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स या DigiLocker मध्ये सुरक्षित ठेवू शकता.

Read in English