हाच तो आणीबाणी लादणारा पक्ष; अर्णब गोस्वामी हल्ल्यावरून भाजपाचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 03:51 PM2020-04-23T15:51:53+5:302020-04-23T16:08:03+5:30

अर्णब गोस्मावी यांच्या गाडीवर २ अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली असून तपास सुरु आहे. आपल्या पत्नीसह ते स्टुडिओतून घराकडे जात असताना दोन अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला.

रिपल्बिक टीव्ही या वृत्तवाहिनीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्मावी यांनी पालघर हत्याकांडाच्या घटनेबाबत न्यूज चॅनेलवर जे वार्तांकन केले. त्यावरुन सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ माजला आहे.

पालघर मॉब लिंचींगमध्ये ३ हिंदू साधूंची हत्या करण्यात आली. त्यावरुन ८० टक्के हिंदू असलेल्या भारत देशात हिंदू साधूंची हत्या होतेयं, असे म्हणत अर्णब यांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अनेक नेटीझन्सने त्यांच्यावर केला आहे.

गोस्वामी यांच्यावरील हल्ल्याचा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांनी निषेध केला आहे. तसेच काँग्रेककडून हा भाषण स्वातंत्र्याचा अवमान असल्याचंही त्यांनी म्हटलय.

काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे धमकी दिल्यानंतर पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर हा हल्ला झाला असून आणीबाणी लादणारा हाच काँग्रेस पक्ष असल्याचे नड्डा यांनी म्हटलंय.

अर्णब गोस्वामी यांच्यावरील हल्ला म्हणजे आणीबाणीची पुनरावृत्ती असून भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचेही नड्डा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलंय.

जबाबदार वृत्तवाहिनी असलेल्या रिपल्बिक टीव्हीच्या माध्यमातून अर्णब गोस्वामी यांनी धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. अर्णब यांनी आपल्या चॅनलवर या संदर्भात वार्तांकन करताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरही सडकून टीका केली होती. ईटलीवाली सोनियाजी... असा त्यांचा वारंवार उल्लेख केल्याने काँग्रेस नेत्यांनीही त्यांच्यावर टीका केलीय.

अर्णब गोस्वामी यांच्या या विधानानंतर काँग्रेस नेते आणि मंत्री नितीन राऊत यांनी अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध नागपूरमध्ये तक्रार दाखल केली आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम अर्णब यांच्याकडू होत असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय.

पालघर सामूहिक हत्याकांडाचे पडसाद सोशल मीडियावर चांगलेच उमटले होते. याप्रकरणाला अनेकांनी जातीय आणि धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनेतशी संवाद साधत संपूर्ण घटनेची माहिती दिली. या घटनेमागे कुठलाही धार्मिक रोष नाही, कुणी धार्मिक रंग देऊन राजकारण करु नये, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले होते.

हाच तो आणीबाणी लादणारा पक्ष; अर्णब गोस्वामी हल्ल्यावरून भाजपाने काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. अॅड. आशिष शेलार यांनीही ट्विटरवरुन काँग्रेसला लक्ष्य केलंय.

या घटनेच्या निमित्ताने काही लोक जातीचे राजकारण करत आहेत. प्रत्यक्षात अटक करण्यात आलेल्या १०१ आरोपींमध्ये एकही मुस्लिम बांधव नाही. काही लोक जाणूनबुजून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाशी अवघे राज्य लढा देत असताना असे राजकारण करणे ही दुर्दैवी बाब आहे, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे.