Omicron Variant : टेन्शन वाढलं! एका व्यक्तीला कितीवेळा होऊ शकते ओमायक्रॉनची लागण?; उत्तर ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 09:37 AM2022-01-24T09:37:24+5:302022-01-24T09:56:40+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. अनेक देशांमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून प्रगत देशही व्हायरसपुढे हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे.

भारतातही कोरोना रुग्णांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर गेल्या काही दिलसांपासून तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनामुळे चार लाख 80 हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या देखील वाढली असून दहा हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या देखील वाढली असून दहा हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान चिंता वाढवणारी आणखी एक घटना समोर आली आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक वेगाने या प्रकारामुळे रुग्ण बाधित होत आहेत.

ओमायक्रॉन हा एक असा व्हेरिएंट आहे जो अँटीबॉडीजला चकमा देतो. मग त्या अँटीबॉडीज लसीकरणामुळे तयार झालेल्या असोत किंवा जुन्या कोरोना संसर्गामुळे तयार झालेल्या असोत याची लागण पुन्हा होऊ शकते.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत एकाच व्यक्तीला दोनदा कोरोना संसर्ग झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली होती. अशी अनेक प्रकरणे होती ज्यात एकाच व्यक्तीला दोनदा डेल्टा संसर्ग झाला होता. त्यामुळे आताही असा प्रश्न विचारला जात आहे, की ओमायक्रॉन प्रकार एखाद्या व्यक्तीला किती वेळा संक्रमित करू शकतो.

रिसर्चनुसार, ओमायक्रॉनमध्ये पुन्हा संसर्ग होण्याचा धोका डेल्टा प्रकारापेक्षा 4 पट जास्त आहे. अशा परिस्थितीत एकाच व्यक्तीला 2 वेळा ओमायक्रॉनचा संसर्ग होण्याची शक्यता सहज निर्माण होते.

आपल्या शरीरात अँटीबॉडीज असतानाही ओमायक्रॉनची लागण होऊ शकते. त्यामुळे ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत किंवा त्यांना आधीच कोरोना किंवा ओमायक्रॉनची लागण झाली आहे, अशा लोकांनाही सहज संसर्ग होत आहे.

ओमायक्रॉन टाळण्यासाठी महत्त्वाच्या कामासाठीच फक्त घराबाहेर पडावे. बाहेर पडताना डबल मास्क वापरा. हात वारंवार स्वच्छ करावेत. अन्नपदार्थ खाण्यापूर्वी हात साबणाने चांगले धुवा. आपले डोळे, तोंड किंवा चेहऱ्याला बाहेर असताना हात स्वच्छ केल्याशिवाय स्पर्श करू नका. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ओमायक्रॉनची लागण झालेल्या लोकांमध्ये दिसणारी लक्षणंही सौम्य आहेत. कोविडचे वेळोवेळी येणारे नवीन प्रकार पाहता, कोरोना लक्षणांच्या प्रोफाइलमध्येही बदल करण्यात आले आहेत.

न्यूजजीपीमधील प्रोफेसर टिम स्पेक्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर आपण 2020 मध्ये आलेल्या अल्फा व्हेरिएंटची लागण झाल्यानंतर त्याची खोकला, ताप आणि वास येणं कमी होणं अशी 3 लक्षणं खूप सामान्य होती.

प्रोफेसर स्पेक्टर हे ZOE कोविड स्टडीचे प्रमुख शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी लाखो App युजर्सद्वारे साथीच्या आजारातील घडामोडींचा मागोवा घेतला आहे. त्यांनी सांगितलं की, जेव्हा कोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरिएंट आला, तेव्हा आम्हाला त्याच्या लक्षणांमध्ये बदल दिसला.

अव्वल रँकिंगमध्ये असलेल्या 'अल्फा'ची लक्षणं दिसणं कमी होऊन डेल्टाची लक्षणं मोठ्या प्रमाणात दिसू लागली. नाक गळणं, घसा खवखवणं आणि वारंवार शिंका येणं ही त्यांच्यात दिसणारी सामान्य लक्षणं आहेत.

विशेषतः ही लक्षणं पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांमध्ये दिसून आली आहेत. कोरोनाची तिसरी लाट आल्याने सध्या परिस्थिती वाईट झाली आहे. कोरोनाच्या तिसर्‍या प्रकाराबद्दल पाहिलं तर डेल्टा व्हेरिएंटचा ट्रेंड पुढे नेत असल्याचं दिसतं.