फक्त प्रिया प्रकाशच नाही हे चार जणही 'सोशल मीडिया'मुळे रातोरात झाले स्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 07:10 PM2018-02-13T19:10:57+5:302018-02-13T19:15:36+5:30

'ओरु आडार लव्ह' या सिनेमातील ‘Manikya Malaraya Poovi’ या गाण्यातील एक दृश्यामुळे प्रिया प्रकाश वारियर एका रात्रीत स्टार बनली आहे. पण सोशल मीडियामुळे रातोरात स्टार होणारी प्रिया एकमेव नाहीय.

अर्शद खान या पाकिस्तानी चहावाल्याला सोशल मीडियामुळे 2016 साली रातोरात प्रसिद्धी मिळाली. जिया अलीने त्याचा चहा विकतानाचा फोटो काढला आणि इन्स्टाग्रामवर शेअर केला. या एका फोटोमुळे अर्शद इतका लोकप्रिय झाला कि, त्याला मॉडेलिंगचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

पीट्रो बोसेलीला त्याच्या चाहत्यांनी जगातील सेक्स गणित शिक्षकाचा टॅग दिला आहे. 2016 साली त्याचा फोटो व्हायरल झाला. पीट्रो लंडन विद्यापीठात गणित विषय शिकवतो. त्याचा फोटो एका विद्यार्थ्याने सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

काहीवेळा तुम्हाला तुमच्या हँडसम असण्याची किंमत चुकवावी लागते. ओमर बोरकान अल गालाला 2013 साली खूप हँडसम दिसतो म्हणून सौदी अरेबियाने देश सोडायला सांगितले.

चेह-यावरील हास्य आणि लुक्समुळे ली मीनवीला सोशल मीडियावर मोठया प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. तो सिंगापूरच्या चांगी विमानतळावर पोलीस अधिकारी आहे.