मुख्यमंत्र्यांनी शहिदाच्या पार्थिवाला दिला खांदा, निरोप देण्यासाठी लोटला जनसमुदाय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 08:41 PM2020-06-19T20:41:31+5:302020-06-19T20:56:14+5:30

शुक्रवारी शहिदाच्या पार्थिवावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

भारत-चीनमधील संघर्षात मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील एक जवान शहीद झाल्यानं पूर्ण जिल्ह्यात शोकाकुल वातावरण आहे.

शहीद नायक दीपक सिंह फिरेंदा गाव मनगवाचे रहिवासी होते. शुक्रवारी शहिदाच्या पार्थिवावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

सीएमनी ट्विट करत मध्य प्रदेशच्या सरकारकडून शहिदाच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानांनी शहीद नायक दीपक सिंह यांच्या पार्थिवाला खांदा दिला अन् श्रद्धांजली अर्पण केली.

तसेच शहिदाच्या पत्नीला सरकारी नोकरी देणार असल्याचंही आश्वासन दिलं आहे. एका रस्त्याला त्या शहिदाचं नाव दिलं जाणार असून, गावात त्यांची प्रतिमा स्थापित करण्यात येणार आहे.

नायक दीपक सिंह यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली देण्यासाठी दुचाकीवरून जनसमूह लोटला होता. सैन्य अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, भाजपाध्यक्ष वीडी शर्मा, प्रभारी मंत्री मीना सिंह आणि माजी मंत्री राजेंद्र शुक्ल यांचाही समावेश होता.

शहिदाला मोठ्या भावानं मुखाग्नी दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चीनचा विरोध करत चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं.

30 वर्षांचा नायक दीपक सिंह 2013 मध्ये सैन्यात भरती झाला होता. दीपकला लग्नानंतर बॉर्डरवर ड्युटीसाठी गेला होता आणि त्यानंतर ते शहीद झाल्याची बातमी आली.

रीवा जिल्ह्यातील छोट्या खेड्यातल्या फरेंदामधील शेतकरी गजराज सिंह यांनी दोन्ही मुलं सैन्यात भरती झाली होती. भारतीय सैन्याच्या 75व्या बटालियनमध्ये राजस्थानमधील जैसलमेर बॉर्डरवर मोठा मुलगा प्रकाश सिंह कर्तव्याला आहे.

गलवान घाटीत हिंसक चकमकीत कर्नल संतोष बाबू, सुबेदार नुदूराम सोरेन, सुबेदार मंदीप सिंह, सुबेदार सतनाम सिंह, हवालदार के. पलानी, हवालदार सुनील कुमार, हवालदार बिपुल रॉय, दीपक कुमार, शिपाई राजेश ओरंग, शिपाई गणेश राम, शिपाई चंद्रकांत प्रधान, शिपाई अंकुश, शिपाई गुरबिंदर, शिपाई गुरतेज सिंह, शिपाई चंदन कुमार, शिपाई कुंदन कुमार, शिपाई अमन कुमार, शिपाई जयकिशोर सिंह, शिपाई गणेश हंसदा हे शहीद झाले आहेत.

आजीशी शेवटचं बोलणं झालं होतं, तेव्हा दीपकनं कोरोना संपल्यानंतर परतेन, असं तिला सांगितलं होतं. आता आजीला विश्वासच बसत नाहीये की, आपल्या घरचा दीपक विझला आहे. नायक दीपकच्या शहीद झाल्याच्या बातमीनंतर संपूर्ण गावात शोकाकुल वातावरण होते.

सैन्यानं गुरुवार सकाळी साडेआठ वाजता नायक दीपक सिंह शहीद झाल्याची बातमी दिली. त्यावर कुटुंबीयांना विश्वासच बसला नाही. त्यावेळी नायक दीपकचे मोठे भाऊ आणि सैन्यात पदस्थ असलेल्या चुलत भावाकडून माहिती मागवण्यात आली, तेव्हा कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली.

तर शहीद दीपक सिंह बिहार रेजिमेंटमध्ये पदस्थ होता. शहीद दीपक आईचे निधन बऱ्याच वर्षांपूर्वी झाले होते. त्यानंतर आजी फूल कुमारी यांनी दीपकचं पालनपोषण केलं.

नायक दीपकचं 30 नोव्हेंबर 2019 रोजी लग्न झाले होते. पत्नी रेखा सिंह नवोदय विद्यालय सिरमौरमध्ये शिक्षिका आहेत.