सोशल मीडियावर मोदींनी ट्रम्पना हरविले, पण ओबामांना ओव्हरटेक अशक्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 04:50 PM2019-05-07T16:50:04+5:302019-05-07T16:55:35+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर फॉलोअर्सच्या संख्येमध्ये अमेरिकेचे वादग्रस्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकले आहे. मात्र, माजी राष्ट्राध्यक्ष आणि मोदींचे 'दोस्त' बराक ओबामा यांच्या लोकप्रियतेला ते धक्काहू लावू शकणार नाहीत. सोशल मीडिया फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर मोदींचे तब्बल 11,09,12,648 फॉलोअर्स झाले आहेत.

धक्कादायक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणुकांमध्ये आव्हाने देणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची सोशल मीडियावरील लोकप्रियता मोदींच्या साडे नऊ पटींनी कमी आहे. राहुल गांधी यांचे 1.2 कोटी फॉलोअर्स आहेत.

पंतप्रधान मोदी यांचे 11 कोटी फॉलोअर्स असले तरीही त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. कारण मोदींच्या दाव्यानुसार त्यांचे मित्र बराक ओबामा हो खूप पुढे आहेत. ओबामा यांचे तब्बल 18,27,10,777 एवढे फॉलोअर्स आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बराक ओबामा यांच्यातील फरक हा सात कोटींचा आहे. आणि एवढा मोठा फरक गाठणे हे जवळपास अशक्य वाटत आहे.

ऑनलाईन सर्व्हे करणारी कंपनी सॉस प्‍लेटफार्म सेम्रुश (SaaS platform SEMrush) ने ही आकडेवारी प्रसिद्द केली आहे. ट्विटरवर फॉलोअर्सच्या संख्येत डोनाल्ड ट्रम्प ओबामांनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर या कंपनीच्या प्रमुखांनी सांगितले की, मोदींचा लोकप्रियता अधिक आहे.

काही महिन्यांपूर्वी आलेल्या Twiplomacyच्या अहवालामध्ये फेसबुकवर मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्या खासगी खात्यावर चार कोटी 36 लाख लाईक्स आहेत. तर सरकारी पेजवर एक कोटी 37 लाख लाईक्स आहेत. या बाबतीतही मोदींनी ट्रम्पना मागे टाकले आहे.