Man V/s Wild कार्यक्रमात दिसणार मोदी, असणार वेगळाच थाट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 04:32 PM2019-07-29T16:32:04+5:302019-07-29T16:38:30+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच जंगल सफारीवर जाणार आहेत. बेअर ग्रिल्सबरोबर मोदी हा चित्तथरारक अनुभव घेणार आहेत.

अंगावर शहारे आणणारा मॅन व्हर्सेस वाईल्ड हा डिस्कवरी चॅनेलवरचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांना माहीतच असेल.

जगातील कुठल्याही भागातील अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीतून मार्ग काढून सुखरूपपणे बाहेर पडणाऱ्या बेअर ग्रिल्सचा हा कार्यक्रम अनेकांच्या दृष्टीने कुतूहलाचा विषय आहे.

बेअर ग्रिल्सच्या या शोमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जंगल सफारी करताना दिसणार आहेत.

खुद्द बेअर ग्रिल्स यानेच ट्विट करून ही माहिती दिली आहे.

मॅन व्हर्सेस वाईल्डचा हा विशेष भाग 12 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता डिस्कव्हरी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

नैसर्गिक संसाधनांचा वापर करून जंगलातून कशा प्रकारे आपल प्रवास करू शकतो हे या कार्यक्रमात दाखवण्यात आलं आहे.

या कार्यक्रमात साप, विंचू, मगरींचा जिवंत थरार अनुभवास मिळतो. बेअर ग्रिल्सच्या जीवघेण्या कसरतींमुळेच या कार्यक्रमात एक प्रकारचा थरार दिसतो.