अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या काश्मीरमधील अनेक ऐतिहासिक मंदिरात पुन्हा होणार घंटानाद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 03:30 PM2019-09-25T15:30:14+5:302019-09-25T15:45:41+5:30

1986 मध्ये काश्मीरमध्ये सुरू झालेल्या हिंसाचारादरम्यान काश्मीर खोऱ्यातील अनेक मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. तर काही मंदिरे कायमची बंद झाली. मात्र अनेक वर्षांपासून बंद असलेली ही मंदिरे पुन्हा उघडण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत.

दक्षिण काश्मीरमधील मार्तंड येथील सूर्य मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर सुमारे 1500 वर्षे जुने आहे.

गंदेरबल जिल्ह्यातील कंगन तालुक्यात असलेले भगवान शिवशंकराचे हे मंदिर सुमारे 1500 वर्षे जुने आहे. गतवर्षी या मंदिरात मोडतोड झाल्याचे वृत्त आले होते.

श्रीनगरपासून 30 किमी दूर असलेल्या गंदेरबल जिल्ह्यातील तुल्ला मुल्ला गावात असलेले हे मंदिर काश्मिरी पंडितांची आराध्य देवता असलेल्या रंगन्या देवीचे आहे. या मंदिरात दरवर्षी खीर भवानी महोत्सव साजरा होतो.

श्रीनगरमधील पुलवामापासून 20 किमी अंतरावर असलेल्या खरेव येथे ज्वाला देवी मंदिर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे मंदिर बंद आहे.

पहलगाम मार्गावरील श्रीनगरपासून 61 किमी अंतरावर हिंदू धर्मीयांचे हे पवित्र ठिकाण आहे. हे एक शिव मंदिर असून, त्याच्या शेजारी एक नैसर्गिक झराही आहे. मात्र हे मंदिरसुद्धा अनेक वर्षांपासून बंद आहे.