दिल्लीतील उड्डाणपुलांचं बदललेलं रुप पाहिलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2018 03:32 PM2018-05-09T15:32:02+5:302018-05-09T15:34:30+5:30

सार्वजनिक ठिकाणच्या भिंती म्हणजे घाण, दुर्गंधी आणि अस्वच्छता ठरलेली. मात्र दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेच्या भिंतींवर अतिशय सुंदर चित्रं काढण्यात आली आहेत.

पुलाच्या भितींवर हातावर द्रोणगिरी उचलून नेणारा हनुमान पाहायला मिळतोय. या सुंदर आणि रंगीबेरंगी चित्रामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडलीय.

निझामुद्दीन पुलाखाली दिल्लीतील प्राचीन वास्तूंची सुंदर चित्रं पाहायला मिळताहेत. त्यामुळे हा परिसर अतिशय सुंदर दिसू लागलाय.

दिल्ली स्ट्रिट आर्ट या संस्थेच्या स्वयंसेवकांनी दिल्लीतील अनेक भागांचं रुपडं पालटलंय.

दिल्लीतील अनेक सार्वजनिक ठिकाणं या चित्रांमुळे अतिशय सुंदर दिसू लागली आहेत.