'ताशिगंग' जगातील सर्वात उंच मतदान केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 04:04 PM2019-04-24T16:04:24+5:302019-04-24T16:21:37+5:30

ताशिगंग, 15,256 फूट उंचीवर हिमाचल प्रदेशमधील गाव आता जगातील सर्वात उंच मतदान केंद्र बनले आहे.

भारत-चीन सीमेपासून सुमारे 29 किमी अंतरावर असलेल्या या मतदान केंद्रामध्ये ताशिगंग व गेट या दोन गावांचा समावेश आहे.

ताशिगांग मतदान केंद्र बौद्ध-वर्चस्व असलेल्या लाहौल-स्पीतिमध्ये येते.

हिमाचल प्रदेशात लोकसभेसाठी 19 मे रोजी मतदान होणार आहे. यावेळी ताशीगंग आणि गेटमधील 48 मतदार या केंद्रात जाऊन मतदान करणार आहेत.

ताशिगंगमध्ये वीज आणि पाणीपुरवठा यासारख्या सर्व आवश्यक सुविधा असूनही मोबाईल कनेक्टिविटी नाही. त्यामुळे निवडणूक अधिकारी मतदानासाठी उपग्रह फोनचा वापर करतील.

सुरुवातीला निवडणूक अधिकाऱ्यांनी गेट गावात मतदान केंद्राची स्थापना करण्याचे ठरवले होते, परंतु तेथील सरकारी शाळेच्या इमारतीस सुरक्षित सापडले नाही म्हणून ताशिगंगला हलविले.

यापूर्वी हिमाचल प्रदेशातील हिक्कीमची 14400 फूट उंचीची छोटी सी वसाहत ही देशातील सर्वात जास्त उंचीचे मतदान केंद्र होते.