कर्नाटकात 1 नोव्हेंबरच्या दिवशी साजरा करण्यात येणारा कन्नड राज्योत्सव उत्साहात संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 09:38 PM2017-11-01T21:38:46+5:302017-11-01T21:43:35+5:30

कर्नाटकात 1 नोव्हेंबरच्या दिवशी कन्नड राज्योत्सव साजरा केला जातो.

1956मध्ये याच दिवशी दक्षिण भारतातील कन्नड बोलणा-या प्रदेशांना एकत्र करून कर्नाटक राज्याची निर्मिती करण्यात आली होती.

राज्यातील सर्व शाळांनी कन्नड भाषा शिकवली पाहिजे, असं प्रतिपादनही यावेळी सिद्धरामय्या यांनी केलं आहे.

या कार्यक्रमाला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कर्नाटकात झालेल्या या कार्यक्रमात सांस्कृतिक नृत्याविष्काराची रेलचेल होती.

बंगळुरुमधील कांतीरवा स्टेडिअममध्ये 62व्या कर्नाटका राज्योत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.