बापरे! कोरोना नाही तर आता डेंग्यूच्या रुग्णामध्ये आढळला Black Fungus; 'या' ठिकाणी सापडले रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 04:52 PM2021-10-30T16:52:55+5:302021-10-30T17:11:48+5:30

Black Fungus seems in Dengue Patients : काही राज्यांमध्ये डेंग्यूमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान काही ठिकाणी ब्लॅक फंगस आणि डेंग्यूचा देखील कहर पाहायला मिळाला.

काही राज्यांमध्ये डेंग्यूमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र असं असताना आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोनानंतर टेन्शन वाढवणारा ब्लॅक फंगस (black fungus) पुन्हा एकदा डोकवर काढताना दिसत आहे. ब्लॅक फंगस आता डेंग्यूच्या रुग्णांमध्ये आढळून येत आहे. इंदूरमधील 50 वर्षीय रुग्णामध्ये हा प्रकरण आढळून आला आहे.

आठवडाभरापूर्वी डेंग्यूतून बरा झालेल्या धार जिल्ह्यातील या रुग्णामध्ये आता अचानक म्युकोरमायकोसिसची (Mucormycosis) लक्षणे दिसू लागली आहेत. इंदूरमधील ही पहिलीच घटना आहे, ज्यामध्ये डेंग्यूनंतर रुग्णामध्ये ब्लॅक फंगस दिसून आलं आहे.

संपूर्ण राज्यातील ही दुसरी घटना आहे. लाईव्ह हिंदुस्तानमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या व्यक्तीवर सध्या इंदूरमधील चोइथराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या व्यक्तीमध्ये 15 ऑक्टोबर रोजी ब्लॅक फंगसची लक्षणे दिसू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णाने आठवडाभरापूर्वीच डेंग्यूवर मात केली होती.

सल्लागार ईएनटी डॉक्टर अभिक सिकधर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाच्या नाकाची एन्डोस्कोपी करून कॅविटी काढण्यात आली आहे. संसर्गामुळे त्याला अद्याप स्पष्ट दिसत नसलं तरी त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहेत.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जबलपूरमध्येही असाच एक प्रकार समोर आला होता. येथेही डेंग्यूमधून बरे झाल्यानंतर एका रुग्णाला ब्लॅक फंगसची लागण झाली होती. इंदौरच्या एमवाय रुग्णालयामध्ये म्युकोरमायकोसिसचे 12 रुग्ण दाखल आहेत.

रुग्णालयातील या सर्व रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे आणि त्यानंतर त्यांना कोणत्यातरी गंभीर आजाराने घेरलं आहे. आता हे सर्व रुग्ण या गंभीर आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.