Indian Railway: तुमच्या एका प्रवासावर रेल्वे करते तिकिटाच्या रकमेपेक्षा एवढा अधिक खर्च, आकडेवारी वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 01:38 PM2021-10-20T13:38:17+5:302021-10-20T13:44:06+5:30

Indian Railways: तुम्ही रेल्वेचं तिकीट खरेदी करता आणि ट्रेनमधून प्रवास करता. मात्र तुम्ही जेवढा प्रवास करता तेव्हा त्या प्रवासाचे पूर्ण पैसे रेल्वेला दिले आहेत, असे तुम्हाला वाटते. मात्र हे खरे नाही.

तुम्ही रेल्वेचं तिकीट खरेदी करता आणि ट्रेनमधून प्रवास करता. मात्र तुम्ही जेवढा प्रवास करता तेव्हा त्या प्रवासाचे पूर्ण पैसे रेल्वेला दिले आहेत, असे तुम्हाला वाटते. मात्र हे खरे नाही. कारण जर तुम्ही रेल्वे तिकीटासाठी ५०० रुपये दिले असतील, तर या प्रवासासाठी रेल्वे तुमच्यावर ५०० रुपये अधिक खर्च करते. म्हणजेच तुम्हाला एकूण खर्चामध्ये सब्सिडी दिली जाते. जाणून घेऊया आपल्या रेल्वे प्रवासासाठी तिकिटापेक्षा रेल्वे किती अधिक खर्च करतं ते.

अनेक रिपोर्टमधून समोर आलेल्या माहितीनुसार पॅसेंजर ट्रेनमधील प्रवाशांकडून रेल्वेला खर्चापैकी केवळी ५७ टक्के रकमेची वसुली होते. उर्वरित खर्च हा रेल्वे आपल्याकडून देते. जर तुम्ही विंडो तिकीट खरेदी केलं. तर त्याची माहिती तिकिटावरही असते.

इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार प्रवासी वाहतूक सेवेमधून केवळ ५७ टक्के उत्पन्न मिळते, असे रेल्वे सांगते.

अंदाज लावायचा झाल्यास प्रथम श्रेणी एसीचे तिकीट ४ हजार ७५५ रुपये एवढे असल्यास रेल्वेला सुमारे ७ हजार १७५ रुपये खर्च येतो. त्याचाच अर्थ रेल्वेला प्रत्येक प्रवाशासाठी ३ हजार ८५ रुपये खर्च करावे लागतात. म्हणजेच प्रत्येक प्रवाशावर एवढा खर्च रेल्वेला करावा लागतो. याच प्रमाणे टू टियर एसीमध्ये २ हजार ८७० रुपये तिकीट असेल तर त्यावरील १ हजार ७९३ रुपये रेल्वे देते.

रेल्वेच्या पॅसेंजर ट्रेनसाठी अधिक खर्च होते आणि त्यातून उत्पन्न कमी मिळते. तसेच मोठ्या प्रमाणावर सब्सिडीही द्यावी लागते. अशा परिस्थितीत फ्रेटमधून या सब्सिडीची भरपाई केली जाते.