केरळात महापूर - जनजीवन विस्कळीत...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 06:18 PM2018-08-11T18:18:02+5:302018-08-11T18:27:48+5:30

केरळमध्ये बुधवारपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीनव विस्कळीत झाले असून आतापर्यंत 29 जणांचा बळी गेला आहे.

आशियातील सर्वांत मोठे वक्राकार धरण म्हणून नावाजलेले केरळमधील इडुक्की धरण पावसामुळे भरुन वाहू लागल्याने धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत.

तब्बल 40 वर्षांत पहिल्यांदाच केरळमध्ये अशी पूरस्थिती निर्माण झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून काही ठिकाणी भूसख्खलनही झाले आहे.

मुसळधार पावसाचा राज्यातील सहा जिल्ह्यांना मोठा तडाखा बसला असून, मदतकार्यासाठी तीनही सेनादलांना पाचारण करण्यात आले आहे.

प्रचंड पावसामुळे वयानड जिल्ह्यामध्ये दरडी कोसळून त्याचा इतर भागांशी संपर्क तुटलेला आहे. तेथील तब्बल 10,400 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

केरळमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर, अनेकजण पाण्यातून जीव वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुख्यमंत्री विजयन यांनी हवाई दौरा करुन केरळमधील पूरस्थितीची पाहणी केली. तर केरळ पोलिसांनी चक्क खांद्यापर्यंत पाण्यात भिजून आपली ड्युटी बजावली.