Gold-Silver Rate: सुवर्णसंधी! सोनं अन् चांदीच्या किंमती आजही स्थिर; जाणून घ्या, आजचा नेमका दर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 12:09 PM2022-05-16T12:09:56+5:302022-05-16T12:16:37+5:30

लग्नसराईचा हंगाम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्यने चढ-उतार होत आहे.

गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार आज २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,४५० रूपयांवर व्यवहार करत आहेत. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या किंमतीत वाढ झालेली नाही. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ४६,२५० रुपये इतके आहे.

तर १ किलो चांदीचा दर ५९,४०० रूपयांवर व्यवहार करत आहे.

विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.