टर्मिनस, सेंट्रल आणि जंक्शन म्हणजे काय रे भाऊ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 02:52 PM2019-10-09T14:52:49+5:302019-10-09T14:57:48+5:30

रेल्वे स्टेशनवर अनेकदा टर्मिनस, सेंट्रल आणि जंक्शन असं लिहिलेलं असतं. यातील नेमका फरक जाणून घेऊया.

टर्मिनस म्हणजे पुढे रेल्वे ट्रॅक नाही. याचाच अर्थ ट्रेन ज्या दिशेने आली त्याच दिशेने परत जाणार आहे.

भारतात सध्या 27 स्टेशनवर टर्मिनस असं लिहिलं आहे.

सेंट्रल म्हणजे त्या शहरात एकापेक्षा अधिक रेल्वे स्टेशन्स आहेत.

सर्वात जुन्या रेल्वे स्टेशनवरही सेंट्रल असं लिहिलं जातं.

जंक्शन म्हणजे त्या स्टेशनवर ट्रेनला येण्यासाठी एकापेक्षा जास्त मार्ग आहेत.

एका मार्गाने आलेली ट्रेन दुसऱ्या मार्गाने जाऊ शकते त्याला जंक्शन असे म्हणतात. (एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.)

टॅग्स :रेल्वेrailway