कोरोनाला विसरलात काय? महाराष्ट्रातील अन् देशातील सद्यस्थिती पाहा

By महेश गलांडे | Published: February 11, 2021 10:32 AM2021-02-11T10:32:57+5:302021-02-11T11:07:09+5:30

कोरोना लॉकडाऊन शिथील केल्यानंतर आजही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात आणि देशातील आजची कोरोना रुग्णांचा काय स्थिती आहे, यासंदर्भात माहिती ठेवायला हवी. कोरोना आता हद्दपार झालाय, अशाच अविर्भावात आपण वावरतोय, पण आजही राज्यात दिवसाला 3 हजार पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.

कोरोना अनलॉक आणि मिशन बिगेन अगेननंतर आता सर्वकाही पूर्ववत सुरु होत आहे. येत्या 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालयेही सुरु होणार आहेत. त्यामुळे, कोरोना आता जवळपास संपुष्टात आल्याचे दिसून येते.

राज्यात काही दिवसांपूर्वीच निवडणुका पार पडल्या, त्यावेळेसही जाहीर सभांना आणि मिरवणुकीला बंदी घालण्यात आली होती. कोरोना कमी झाला असला तरी कोरोनाची भीती आहे, असे सांगण्यात येते.

केंद्र सरकारने देशातील सर्व चित्रपटगृहांना 100 टक्के उपस्थितीसाठी परवानगी दिली आहे. मात्र, राज्य सरकारने अद्यापही याबाबत निर्णय घेतलेला नाही. कारण, अद्यापही राज्यात कोरोना रुग्णसंख्या असून काळजी घेणे आवश्यक आहे.

मुंबईतील लोकल सेवाही अद्याप पूर्णपण सुरु करण्यात आली नाही. लोकल पूर्ण क्षमतेनं सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण, वेळेचं बंधन घालण्यात आलंय. टप्प्याटप्प्याने हे बंधन कमी करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय.

कोरोना आता हद्दपार होतोय, असं म्हणता येईल. देशात आणि राज्यात आजही दररोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. देशातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेतल्यास बुधवारी 12 हजार 923 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

देशातील आजपर्यंतच्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 8 लाख 71 हजार 294 एवढी झाली आहे. मंगळवारी 11,764 रुग्णांना घरी पाठविण्यात आले. तर, 108 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात आजपर्यंत एकूण 1 कोटी 5 लाख 73 हजार 372 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तरीही, अद्याप 1 लाख 42 हजार 562 एक्टीव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 55 हजार 360 रुग्णांचा मृत्यू झालाय.

राज्यातील कोरोना परिस्थितीचा विचार केल्यास, बुधवारी 3451 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, तर 2421 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यत 19,63,946 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून घरी पोहोचले आहेत.

राज्यात आजमित्तिला 35,633 एक्टीव्ह रुग्ण आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे, राज्यातूनही कोरोना हद्दपार होतोय, पण काळजी घेणं गरजेचं आहे.

सार्वजनिक ठिकाणी, बाजारात किंवा गर्दीच्या ठिकाणी पाहिल्यास कोरोनाची भीतीच उरली नाही, असे दिसून येते. कारण, नागरिकांडून मास्कचाही वापर होताना दिसत नाही. पण, अद्यापही काळजी घेणे आवश्यक असल्याचे सरकारकडून सांगण्यात येते.

केंद्र आणि राज्य सरकारकडून आता वाहतूक सेवाही सुरु करण्यात आल्या आहेत. काही आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक वगळता रेल्वे, बस, लोकल आणि खासगी वाहतूकही सुरळीत होत आहे.

कोरोना लॉकडाऊनमधील मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा वापर करणारे नागरिक, आता त्या पद्धतीने काळजी घेताना दिसत नाहीत. अनेक ठिकाणी गर्दी करण्यात येते