CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! देशात दर दीड मिनिटाला कोरोना घेतोय एकाचा 'बळी'; धडकी भरवणारी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 09:48 AM2021-07-13T09:48:22+5:302021-07-13T10:04:12+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात कोरोनाचा वेग मंदावत असताना आणखी एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. दर दीड मिनिटाला कोरोना एकाचा 'बळी' घेत आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. रुग्णांच्या संख्येने तब्बल 18 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

जगभरातील सर्वच देश कोरोनाच्या या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे.

देशात कोरोनाचा वेग मंदावत असताना आणखी एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. दर दीड मिनिटाला कोरोना एकाचा 'बळी' घेत आहे. कोरोनामुळे दीड मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होत असल्याची माहिती मिळत आहे.

देशात अद्यापही कोरोनाचा धोका कायम आहे. काही राज्यांमधील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. अशातच डेल्टा प्लससह अनेक व्हेरिएंटमुळे आणखी काळजी वाढली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात दररोज जवळपास दर दीड मिनिटाला कोरोनामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागत आहे. तसेच सध्या लोकांचा निष्काळजीपणा वाढलेला दिसून येत आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील दोन जास्त ही सर्वाधिक कोरोना प्रभावित आहेत. महाराष्ट्र आणि केरळमधील रुग्णांची संख्या ही सर्वात जास्त आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने देखील भारतातील कोरोना मृतांच्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाऊन आणि आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

भारतीय वैद्यकीय संघटनेने (IMA) देशातील सर्व राज्य सरकारांना कोरोना प्रादुर्भावासंदर्भात मोठा इशारा दिला आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांमध्ये जास्त सूट दिली जाऊ नये अशा स्पष्ट सूचना आयएमएनं राज्यांच्या सरकारांना दिल्या आहेत.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका विसरुन चालणार नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेआधी देशात जास्तीत जास्त लोकसंख्येचं कोरोना विरोधी लसीकरण करणं अतिशय गरजेचं असल्याचंही आयएमएनं नमूद केलं आहे.

देशात कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन काटेकोर पद्धतीनं केलं जात नसल्याच्या मुद्द्यावरही आयएमएनं बोट ठेवलं आहे आणि देशात कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन झालं नाही तर देशाला तिसऱ्या लाटेला निश्चितपणे सामोरं जावं लागेल, असा स्पष्ट इशारा आयएमएनं राज्यांना दिला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप अद्याप पूर्णपणे संपलेला नसतानाही देशाच्या विविध भागांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन सर्सासपणे होत असल्याचं दिसून आल्याच्या मुद्द्यावरही आयएमएनं चिंता व्यक्त केली.

देशातील पर्यटन, तीर्थ यात्रा, धार्मिक उत्साह या सर्वांची आपल्याला आवश्यकता आहे हे देखील आयएमएनं मान्य केलं. पण यासाठी काही महिन्यांची वाट पाहिलेलं खूप चांगलं ठरेल. सध्या देशात काही पर्यटन स्थळावर कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन होताना दिसून आलं आहे. हे जर असंच सुरू राहिलं तर तिसरी लाट येणार हे निश्चित आहे.

वेगाने कोरोना विरोधी लसीकरण आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे, असं आयएमएनं म्हटलं आहे. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांकडे 38.86 कोटींहून अधिक कोरोना लसीचे डोस उपलब्ध करुन देण्यात आले