Covid-19 Vaccine: भारतीय, युके व्हेरिअंटवर Covaxin प्रभावशाली; अहवालातून दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 08:48 AM2021-05-17T08:48:09+5:302021-05-17T08:52:56+5:30

Covaxin ही लस भारत आणि ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूच्या स्ट्रेनविरोधात प्रभावशाली असल्याचं भारत बायोटेकचं म्हणणं.

भारत आणि ब्रिटनमध्ये सापडलेल्या स्ट्रेनविरोधात आपली कोव्हॅक्सिन (Covaxin) ही लस अधिक प्रभावशाली असल्याचं भारत बायोटेकनं रविवारी म्हटलं.

मेडिकल जनरल क्लिनिकल इफेक्शिअस डिसिसिजमध्ये छापण्यात आलेल्या अहवालाचा हवाला देत भारत बायोटेकनं हा दावा केला आहे.

कोव्हॅक्सिन ही लस सर्व प्रकारच्या नव्या व्हेरिअंट विरोधात काम करते. यामध्ये B.1.617 आणि B.1.1.7 यांचा समावेश आहे. हे सर्वप्रथम अनुक्रमे भारत आणि ब्रिटनमध्ये आढळले होते.

त्यात पुढे असं म्हटलं आहे की हा अभ्यास नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्यात करारानुसार करण्यात आला.

एका ट्वीटमध्ये भारत बायोटेकचे सह-संस्थापक आणि सह-व्यवस्थापकीय संचालक म्हणाले की कोव्हॅक्सिनला पुन्हा आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे.

तसंच ही मान्यता वैज्ञानिक रिसर्च डेटाद्वारे देण्यात आली आहे. यामध्ये नव्या व्हेरिअंटविरोधात सुरक्षा पुरवत असल्याचीही माहिती देण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.

त्यांनी ट्विटमध्ये पीएमओ इंडिया, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासह अनेकांना टॅग केलं आहे.

भारत बायोटेकच्या म्हणण्यानुसार अभ्यासातून समोर आलं आहे की B.1.617 च्या विरोधात व्हॅक्सिन व्हेरिअंट D614G शी तुलना केल्यावर न्यूट्रलायझेशनमध्ये १.९५ फॅक्टरची कमी दिसून आली आहे.

तसंच यानंतर B.1.617 च्या विरोधात न्यूट्रलायझिंग लेव्हल सुरक्षित असण्यासाठी आवश्यक स्तरांपेक्षा अधिक होतं असंही पुढे म्हणण्यात आलं आहे.

सध्या देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

देशात नागरिकांना कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसी देण्यात येत आहेत. कोव्हॅक्सिन ही लस पूर्णपणे स्वदेशी आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार राज्यांना २० कोटींपेक्षा अधिक कोरोना लसी मोफत देण्यात आल्या आहेत.

भारत सरकारद्वारे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना २० कोटींपेक्षा अधिक (२०,२८,०९,२५०) लसी मोफत दिल्या असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.

१.८४ कोटी पेक्षा अधिक (१,८४,४१,४७८) लसींचे डोस सध्या त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.

याशिवाय पुढील तीन दिवसांत जवळपास ५१ लाख डोसेस देण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.