Coronavirus: अहो आश्चर्यम्! फक्त दोन वेदनाशामक औषधं घेऊन रुग्ण झाले ठणठणीत, प्रशासनही आश्चर्यचकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 09:12 AM2020-05-20T09:12:56+5:302020-05-20T09:27:41+5:30

Coronavirus: विशेष म्हणजे एकीकडे कोरोना रुग्णांवर वेगवेगेळी औषधं वापरून उपचार केले जात आहेत. तर दुसरीकडे वाराणसीत मात्र फक्त सामान्य औषधांनीच कोरोना रुग्ण बरे होताना दिसत आहेत.

कोरोनाच्या संकटातही वाराणसीतील बाधित रुग्ण दोन साध्या औषधांनी बरे होत असल्याचं सांगितलं जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदीय मतदारसंघात वाराणसीत सकाळी कचोरी, दुपारी थंडाई आणि संध्याकाळी लिट्टी चोखा असे चमचमीत पदार्थ खाणाऱ्या वाराणसीतील लोकांची रोगप्रतिकारक क्षमता पाहून सरकारी कर्मचारीही आश्चर्यचकित झाले आहेत.

माते गंगेच्या आशीर्वादानं हे सर्व होत असल्याचा वाराणसीकरांनी विश्वास व्यक्त केला आहे.

आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 80 टक्के रुग्ण हायड्रोक्लोरोक्विन न वापरता बरे झाले आहेत. साधे पॅरासिटामॉल आणि अँटीबायोटिक्सच्या गोळ्या खाऊन बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

वाराणसीचे डीएम कौशल राज शर्माही वाराणसीतल्या नागरिकांची रोगप्रतिकारकशक्ती पाहून अचंबित झालेत.

वाराणसीत कोरोना व्हायरसची एकूण 101 प्रकरणं आहेत. त्यापैकी 68 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना काळात जणू गंगामाताच या रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरते आहे.

न्यूज 18 शी बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितलं की, वाराणसीमध्ये 80 टक्के कोरोना रुग्ण हायड्रोक्लोरोक्विन औषध न घेताच बरे झालेत.

हे औषध मलेरियाच्या रुग्णांना दिलं जातं. अमेरिकेसहित जगभरात देशांनी भारताकडून हे औषध मागवून घेतलं.

डीएम कौशल राज शर्मा यांनी सांगितलं की, सध्याच्या घडीला वारणसीत 8 लाख गोळ्या उपलब्ध आहेत. या औषधाचा पुरवठा करणाऱ्या कंपनीचं एक स्टोरही वाराणसीत आहे, जिथून पूर्वांचलात या औषधाचा पुरवठा होतो.

आतापर्यंत वाराणसीत आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण हायड्रोक्लोरोक्विन (Hydroxychloroquine) औषधाशिवायच बरे झालेत.

. इथल्या बहुतेक रुग्णांना साधारण पॅरामसिटामॉल (Paracetamol) आणि अँटिबायोटिक्स (Antibiotics) देण्यात आलेत आणि त्यांनी ते ठीकठाक झाले आहेत.

विशेष म्हणजे एकीकडे कोरोना रुग्णांवर वेगवेगेळी औषधं वापरून उपचार केले जात आहेत. तर दुसरीकडे वाराणसीत मात्र फक्त सामान्य औषधांनीच कोरोना रुग्ण बरे होताना दिसत आहेत.

Read in English