CoronaVirus Updates: देशात नव्या १० हजार ३०२ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 11:15 AM2021-11-20T11:15:53+5:302021-11-20T11:18:42+5:30

गेल्या २४ तासांत देशभरात १०३०२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या दिवसभारत ११७८७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

देशभरात सध्या १,२४,८६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी राज्य सरकार आणि स्थानिक महापालिका यांनी केले्या प्रयत्नांना यश येत आहे.

कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत आहे. मृत्यूदरदेखील कमी होत आहे. राज्यात शुक्रवारी ९०६ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. १५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून ९१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

राज्यातील मृत्यूदर २.२१२ टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६४,७२,६८१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६५ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,४४,८९,४७१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,२८,७४४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ९९,३६९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर १००९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण ११,७०४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. शुक्रवारी राज्यात ९०६ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६६,२८,७४४ झाली आहे.