Coronavirus Updates: ८ तासांनंतर मास्क बदलणं गरजेचं; केंद्र सरकारने जारी केली होम क्वारंटाईनसाठी नवी नियमावली

Published: May 10, 2021 10:57 AM2021-05-10T10:57:14+5:302021-05-10T11:13:27+5:30

Coronavirus News In Maharashtra: केंद्र सरकारने होम क्वारंटाईनसाठी नवी नियमावली जारी केली आहे. ( Central Government issues new regulations for Home Quarantine)

देशात गेल्या चोवीस तासांत ३ लाख ६६ हजार १६१ नवे रुग्ण आढळले. तर दिसभरात कोरोनामुळे ३७५४ जणांचा मृत्यू झाला. तसेच, ३ लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण वाढीचा आकडा इतर दिवसाच्या तुलनेत कमी असल्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ कोटी २६ लाख ६२ हजार ५७५ झाली असून, त्यातील १ कोटी ८६ लाख ७१ हजार २२२ जण बरे झाले. या कोरोना संसर्गाने आतापर्यंत २ लाख ४६ हजार ११६ जणांचा बळी घेतला आहे. देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ३७ लाख ४५ हजार २३७ इतकी आहे.

गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट देशाला नव्या संकटाच्या गर्तेत ढकलताना दिसत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने दररोज हजारो भारतीयांना प्राण गमावावे लागत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी अनेक राज्यांत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याचदरम्यान केंद्र सरकारने होम क्वारंटाईनसाठी नवी नियमावली जारी केली आहे.

घरी राहून कोरोनावर उपचार घेणाऱ्या लाखो रुग्णांसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली जारी केली आहे. ही नवीन नियमावली नेमकी कसी आहे, जाणून घ्या...

गृह विलगीकरणातील रुग्णासाठी खोलीली संलग्न- स्वतंत्र स्नानगृहाची सुविधा पाहिजे.

इतर आजार आणि वृद्ध रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गृह विलगीकरणाची परवानगी द्यावी.

रुग्णांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीचा रुग्णालयाबरोबर नियमित संपर्क असावा.

विलगीकरणात पूर्णवेळ रुग्णांची काळजी घेणारी व्यक्ती असावी.

रुग्ण राहत असलेल्या खोलीत भरपूर हवा खेळती राहिली पाहिजे.

रुग्णांनी घरात असतानाही तीन पदरी वैद्यकीय मास्क वापरला पाहिजे. ८ तासांनंतर हा मास्क बदलणे आवश्यक असणार आहे.

रुग्ण राहत असलेल्या खोलीतील टेबलचा पृष्ठभाग, दाराच्या कड्या, हँडल यासारख्या गोष्टी फिनाइल याने स्वच्छ करणे गरजेचं असणार आहे.

गृह विलगीकरणात १० दिवस राहिल्यानंतर रुग्णाला कोणताही त्रास नसल्यास रुग्णाचे विलगीकरण संपले.

रुग्णाची काळजी घेणारी व्यक्ती हायड्रोक्सीक्लोरोक्वीन घेऊ शकते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!