CoronaVirus Updates: देशात नव्या ९ हजार ११९ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 10:44 AM2021-11-25T10:44:14+5:302021-11-25T10:46:26+5:30

गेल्या २४ तासांत देशभरात ९ हजार ११९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३९६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

दिवसभरात १० हजार २६४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच सध्या १ लाख ०९ हजार ९४० जणांवर कोरोनाचे उपचार सुरु आहे.

राज्यात बुधवारी कोरोनाच्या ९६० नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ४१ बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १०४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ६४,७८,४२२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात ९,३६६ इतके सक्रिय रुग्ण आहेत.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६८ टक्के, तर मृत्युदर २.१२ टक्के आहे. आजपर्यंत तपासलेल्या ६,४९,५१,९९४ नमुन्यांपैकी १०.२१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात ८४,२६१ व्यक्ती होम क्वाॅरंटाइन, तर १०८४ व्यक्ती संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,३२,२५७ झाली असून, मृतांचा आकडा १ लाख ४० हजार ८०७ आहे.

Read in English