CoronaVirus Updates: देशात नव्या ४३ हजार ६५४ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 12:27 PM2021-07-28T12:27:31+5:302021-07-28T12:31:02+5:30

देशभरात आतापर्यंत ३ कोटी ०६ लाख ६३ हजार १४७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशभरात गेल्या २४ तासांत ४३ हजार ६५४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ६४० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या ३ लाख ९९ हजार ४३६ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ४१ हजार ६७८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशभरात आतापर्यंत ३ कोटी ०६ लाख ६३ हजार १४७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. मंगळवारी ६७५३ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५ हजार ९७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६० लाख २२ हजार ४८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ टक्के आहे.

राज्यात मंगळवारी १६७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.०९ टक्के झाला आहे. तब्बल २८ महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या ९४ हजार ७६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना (२०), हिंगोली (५२), यवतमाळ (१४), गोंदिया (५८), गडचिरोली (९१) या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १००च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त १५, ८०९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने यंत्रणांसह सामान्यांना दिलासा मिळत आहे. शहर उपनगरात मंगळवारी ३४३ रुग्ण आणि पाच मृत्यूंची नोंद झाली, तर दुसरीकडे बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.

मुंबईत दिवसभरात ४६६ रुग्णांनी कोविडवर मात केली असून, आतापर्यंत ७ लाख ११ हजार ३१५ रुग्णांनी कोविडला हरविले आहे. सध्या केवळ ५ हजार २६७ रुग्ण उपचाराधीन आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिकेने दिवसभरात २८ हजार ५८ चाचण्या केल्या असून, आजपर्यंत एकूण ८० लाख १८ हजार ३७७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

शहर उपनगरात सध्या ७ लाख ३४ हजार ७६१ कोरोना बाधित असून, मृतांची संख्या १५ हजार ७६९ आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के झाले असून, २० ते २६ जुलैपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०५ टक्के आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १ हजार ३७७ दिवसांवर पोहोचला आहे. शहरात सध्या केवळ पाच प्रतिबंधित क्षेत्र असून, प्रतिबंधित इमारतींची संख्या ६१ इतकी आहे.