CoronaVirus Updates: देशात नव्या १० हजार ५४९ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 11:34 AM2021-11-26T11:34:20+5:302021-11-26T11:41:39+5:30

गेल्या २४ तासांत दिवसभरात १० हजार ५४९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ४८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरात ९,८६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच सध्या देशभरात १ लाख १० हजार १३३ जणांवर कोरोनाचे उपचार सुरु असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात गुरुवारी ८४८ रुग्ण आणि ५० मृत्यूंची नोंद झाली आहे, तर दिवसभरात ९४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, एकूण ६४ लाख ७९ हजार ३९६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात ९ हजार १८७ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी ५० लाख ४७ हजार ४९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १०.२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६८ टक्के, तर मृत्युदर २.१२ टक्के आहे.

राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ३३ हजार १०५ झाली असून, मृतांची संख्या १ लाख ४० हजार ८५७ इतकी आहे. दिवसभरात नोंद झालेल्या ५० मृत्यूंमध्ये मुंबई ४, नवी मुंबई मनपा १, उल्हासनगर मनपा १, वसई विरार मनपा १, रायगड ११, पनवेल मनपा १, नाशिक ७, नाशिक मनपा ३, अहमदनगर ५, अहमदनगर मनपा ४, पुणे ६, सोलापूर १, सातारा ३, सांगली १, बीड १ इ. रुग्णांचा समावेश आहे.

Read in English