CoronaVirus: तो बोलला अन् झालं; आता युजर्स विचारताय कोरोना कधी जाणार?, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 07:34 AM2021-05-11T07:34:43+5:302021-05-11T08:06:08+5:30

CoronaVirus News: कोरोनाने गेल्या वर्षभरापासून जगभरात मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. कोरोनाची कल्पना कोणी कधीच केली नव्हती.

देशात सलग चार दिवस चार लाखांच्या वर कोरोना रुग्णांची नोंद झाल्यानंतर सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात तीन लाख ६६ हजार १६१ नव्या रुग्णांची भर पडली. या २४ तासात ३७५४ जणांचा मृत्यू झाला, तर एकूण मृत्यूची संख्या २,४६,११६ झाली. देशात आता एकूण रुग्णांची संख्या दोन कोटी २६ लाख ६२ हजार ५७५ झाली आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

सध्या ३७ लाख ४५ हजार २३७ रुग्णांवर उपचार सुरू असून हे प्रमाण एकूण रुग्णांच्या १६.५३ टक्के आहे. कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.३९ टक्के आहे. देशात आतापर्यंत एक कोटी ८६ लाख ७१ हजार २२२ रुग्ण बरे झाले असून मृत्यू दर १.०९ टक्के आहे.

देशात गेल्यावर्षी सात ऑगस्ट रोजी २० लाख कोरोना रुग्ण होते, तर या महिन्यात चार तारखेला रुग्णांचा दोन कोटींचा आकडा ओलांडला गेला होता. रविवारी १४ लाख ७४ हजार ६०६ नमुन्यांची तपासणी केली गेली, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजन बेड्स, औषधे आणि लसींचा तुटवडा यासारख्या समस्यांबद्दलही सोशल नेटवर्कींगवर जोरदार चर्चा सुरु आहे. कोरोनामुळे देशातील आरोग्य व्यवस्थेवर कामालीचा ताण पडला असून अनेक ठिकाणी यंत्रणा कोलमडल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाने गेल्या वर्षभरापासून जगभरात मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. कोरोनाची कल्पना कोणी कधीच केली नव्हती. मात्र तुम्हाला माहिती आहे का, २०१३ मध्ये एका ट्विटर युजर्सने कोरोना विषाणूचा संसर्ग होईल असं ट्विट केलं होतं. आता हे ट्विट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून ते प्रचंड व्हायरल झालं आहे.

कोरोना व्हायरस येणार आहे, असं ट्विट केलं आहे. हे ३ जून २०१३ रोजी हे ट्विट करण्यात आलं आहे.

एक लाख ५ हजार जाणांनी ते रिट्विट केलं आहे तर ७५ हजारहून अधिक जणांनी ते कोट करुन रिट्विट केलं आहे. दोन लाख २२ हजार जणांनी हे ट्विट लाईक केलं आहे.

७ वर्षांआधीच कोरोना व्हायरसच्या यासंदर्भात या व्यक्तीनं भाकित वर्तवलेलं आणि आता हे ट्विट मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यावर अनेक मजेदार प्रतिक्रिया देखील येत आहेत.

हे ट्विट करणाऱ्या व्यक्तीचं नाव मॅक्रो असं आहे. त्याने शेवटचं ट्विट २०१६ साली केलं आहे. तो ट्विटरवर ज्या वर्षी त्याने हे कोरोनासंदर्भातील सध्या चर्चेत असणारं ट्विट केलं त्याच वर्षी आल्याचं प्रोफाइलवरुन दिसतंय. त्याने मार्च २०१३ ला ट्विटर जॉइन केलं आहे. सध्या अचानक त्याच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली आहे.

अनेकांना तारीख पाहून आश्चर्य वाटलं आहे.

मोफत सल्ला दिला होता त्याने असं एकजण मिम्सच्या माध्यमातून म्हणाला आहे.

एका युजर्सने तुला कसं कळलं?, असा सवालही विचारला आहे.

मित्रा कधी जाणार कोरोना ते सुद्धा सांग असं काही जण म्हणत आहेत.

कोरोना येणार असं भागित करणार कदाचित कोरोनामुळे दगावला असेल अशी शक्यता एकाने व्यक्त केली आहे.