पोरी लय हूशार! जोडलेल्या डोक्यासह वेगवेगळे पेपर लिहले अन् जुळ्यांनी दहावीची परिक्षा केली पास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 05:46 PM2020-06-24T17:46:19+5:302020-06-24T18:14:41+5:30

प्रतिकुल परिस्थितीवर मात करत अभ्यास करून यशाचे शिखर गाठलेल्या मुलांची अनेक उदाहरणं तुम्हाला माहीत असतील. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उदाहराबाबत सांगणार आहोत. तेलंगणा राज्यातील दोन मुली डोकं चिकटलेल्या अवस्थेत जन्माला आल्या.

या जुळ्या मुलींनी जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करत दहावीची परिक्षा दिली. फक्त परिक्षा दिली नाही तर या परिक्षेत या जुळ्या मुली उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्या आहेत. अशा अवस्थेत ही कामगिरी करणं मोठा म्हणजे विजय मिळवण्याप्रमाणेच आहे.

या दोन्ही मुलींचे नाव वीणा आणि वाणी असे आहे.

या दोन्ही मुलींचे डोके जन्मापासूनच एकमेकांना जोडलेले आहे. या दोघी conjoined twins म्हणून जन्माला आल्या.

पालकांनी देशभरातील वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवल्यानंतरही या दोघींची डोकी वेगळी होऊ शकली नाहीत.१० कोटी रुपये खर्च करून शस्त्रक्रिया करण्याचा त्यांना सल्ला देण्यात आला होता.

पण मेंदूतल्या सुक्ष्म पेशी आणि रक्तवाहिन्या गुंतल्यामुळे ही शस्रक्रिया जीवघेणी ठरण्याची शक्यता होती.

शेवटी त्यांच्या आई वडिलांना आहे तसं दोघींना स्वीकारलं. दोघींची शरीरं वेगळी आहेत. डोकं जोडलेलं असलं तरीही मेंदू वेगवेगळे आहेत.

तेलंगणा बोर्डाचा निकाल नुकताच लागला आहे.

त्यात GPA 10 पैकी 9.3 points मिळवून वीणा उत्तीर्ण झाली तर वाणीला 9.2 ग्रेड पॉइंड मिळाले आहे. या दोघींच्या विजयामुळे संपूर्ण कुंटुबात आनंदाचे वातावरण आहे.

Read in English