लोकसभा २०२४ चा विजयी महामार्ग! नितीन गडकरींच्या नेतृत्वात केंद्र सरकारचं ‘मिशन २०० प्लॅन’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 05:38 PM2021-09-16T17:38:55+5:302021-09-16T17:44:27+5:30

देशात प्रचंड वेगाने महामार्गाचं जाळं पसरवलं जात आहे. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी आज दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेच्या कामाची पाहणी केली. त्यासोबतच आगामी काळात किती मोठे प्रोजेक्ट पूर्ण होणार आहेत याची माहितीही दिली आहे.

ज्याप्रकारे देशात महामार्गाचं निर्माण सुरू आहे ते पाहता काही तासांचे अंतर काही मिनिटांवर येणार आहे. केंद्र सरकारचा प्रयत्न आहे की, आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील २०० हून अधिक प्रकल्प बनून तयार केले जातील आणि ते लोकांना वापरण्यास मिळतील.

४७ हजार कोटींचा दिल्ली कटरा एक्सप्रेस वे ५७२ किमी असेल. सध्या दिल्ली ते कटरा हे अंतर कापण्यासाठी ७४७ किमीचा पल्ला गाठावा लागतो. हा प्रोजेक्टही २०२४ च्या निवडणुकीपूर्वी पूर्ण केला जाईल. दिल्ली-अमृतसर अवघ्या ४ तासांत तर दिल्ली हरिद्वार केवळ २ तासांत गाठता येईल.

दिल्ली ते कटरा सहा तासांत आणि दिल्ली-मेरठ केवळ ४० मिनिटांत पोहचणं संभाव्य आहे. स्टेट ऑफ आर्ट अंतर्गत खाली रोड आणि वर फ्लायओव्हर बनवण्याचं काम जमशेदपूर, चेन्नई, नागपूरमध्ये सुरू आहे. दिल्ली ते जयपूर किशनगड १२०० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.

दिल्ली मुंबईत सर्वात लांब १३८० किमीचा महामार्ग तयार होत आहे. ८ मार्च २०१९ रोजी या हायवेचं भूमीपूजन करण्यात आले होते. परंतु मार्च २०२३ मध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास येणार आहे. सध्या या महामार्गाचं काम प्रगतीपथावर आहे. ज्या राज्यातून हा हायवे जाणार त्यात हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा समावेश आहे.

दिल्ली NCR मध्ये एअरपोर्टजवळ द्वारका एक्सप्रेस, दिल्ली ते पानीपत एनएच ४४ वर ७० किमी काम जवळपास पूर्ण होत आलं आहे. गोहाना ते सोनीपत १३०० कोटी गुंतवणूक असलेला ३८ किमी लेन २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे. यूपी हरियाणात सोनीपत एन ३३, ३४ इथंही १२०० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.

याठिकाणी ४५ किलोमीटर गुंतवणूक करून रस्ता बनवला जात आहे. दिल्लीमध्ये नव्या रिंग रोड यूआर २ चं काम ८ हजार कोटींची गुंतवणूक करून सहापदरी रस्त्याचं काम पुढील वर्षी सुरू होणार आहे ते ७६ किमीचा रस्ता आहे. हा नव्या मास्टर प्लॅनचा भाग आहे.

दिल्ली NCR मध्ये ५३ हजार कोटीचे १५ प्रोजेक्टचं काम सुरू आहे. ज्यात १४ प्रकल्पाचं काम सुरु झालं आहे. हरियाणा पंजाब येथून ५.५ लाख वाहनं येतात. ज्यातील ७० टक्के वाहनं व्यावसायिक आहेत. ईस्टर्न पेरिफेरलमधून एक लाख वाहनं येतात.

दिल्ली प्रदुषण ४७ टक्के कमी झालं आहे. दिल्ली रंगपुरी ते महिपालपूर दरम्यान वाहतूक समस्या सोडवण्यासाठी नव्या रस्त्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. दिल्ली-मुंबई हायवेवर २-३ स्मार्ट सिटी बनवण्याची कल्पना नितीन गडकरींनी मांडली आहे. त्याशिवाय अतिरिक्त दिल्ली कटरा एक्सप्रेस वे वरही स्मार्ट सिटी बनवण्याचा सल्ला दिला आहे.

Read in English