सेलिब्रिटींची दिवाळी... रजीनकांतनं उडवले फटाके तर सचिनकडून दिव्यांची उजळण

By महेश गलांडे | Published: November 14, 2020 08:01 PM2020-11-14T20:01:13+5:302020-11-14T20:20:53+5:30

देशभरात दिवाळीचं सेलिब्रेशन सुरू असताना सेलिब्रिटींकडून आपल्या सोशल मीडियावरुन दिवाळीचे फोटो शेअर केले जात आहेत. सलमानभाईने हे फोटो शेअर केले आहेत

टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने आपल्या ट्विटवरुन गणपती व लक्ष्मीचा फोटो शेअर करत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

बॅडमिंटनपटू सायना नेहवालने आपल्या पतीसह फोटो शेअर करत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वाळू कलाकार सुदर्शन पटनाईक यांनी अतिशय भावनिक ट्विट केलं आहे, एकीकडे दिवाळीच्या शुभेच्छा देताना, सीमारेषेवर धारातीर्थी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे

सिक्सर किंग युवराज सिंगनेही दिवाळीच्याु शुभेच्छा देताना हा फोटो शेअर केला आहे.

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या टविटर अकाऊंटवरुन दिवाळीचे फोटो शेअर केले आहेत.

सचिन तेंडुलकर घरातील अंगणात दिवे लावताना दिसत आहे, निळ्या रंगाचा कुर्ता सचिनने परिधान केला आहे.

साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्यानेही घरातील दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.

ऐश्वर्याच्या फोटोमध्ये रजनीकांतची संपूर्ण फॅमिली दिसत आहे, ऐश्वर्या तिचा मुलगा, पती, वडिल रजनीकांत आणि आईही फुलबाजे ओवाळताना दिसत आहेत.

रजनीकांत हे अति उत्साही असून दिवाळीचे फटाके फोडताना दिसत आहेत, फुलबाज्याच्या सहाय्याने माळ लावताना दिसत आहेत

सुरेश रैनानेही आपल्या ट्विटरवरुन फोटो शेअर केले आहेत. कुटुंबासमवेत दिवाळी साजरी करतानाचे हे फोटो आहेत

पत्नीसोबतचा सेल्फीही रैनाने शेअर केला आहे. तसेच संपूर्ण कुटुंबासमवेतचा एक गोड फोटोही रैनाने शेअर केला आहे