तेलंगाणाचा आगळावेगळा उत्सव बोनालू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 09:45 PM2018-07-29T21:45:37+5:302018-07-29T22:01:06+5:30

महाकाली बोनालू उत्सव तेलंगाणामध्ये उत्साहात साजरा होत आहे. या उत्सवामध्ये देवी महाकालीची पूजा केली जाते.

हा सण आषाढ महिन्यात साजरा केला जातो. या सणावेळी महिला डोक्यावर घट घेऊन मिरवणुकीतून दर्शनाला जातात. तेथे डोक्यावर घट घेऊन देवीच्या मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते.

बोनालूच्या घटामध्ये हळदीचे पाणी भरलेले असते. त्यावर निंबाची पानं आणि वर एका छोट्या घटामध्ये ज्योत पेटवलेली असते.

बोनालू उत्सवाला तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हेसुद्धा उपस्थित राहिले.

माता महाकालीचे दर्शन घेताना चंद्रशेखर राव.

बोनालू उत्सवानिमित्त सिकंदराबाद येथील उज्जैनी महाकाली मंदिरात झालेली गर्दी.