'भारत बंद' : ठिकठिकाणी कामगार संघटनांची आंदोलने

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 04:07 PM2020-01-08T16:07:45+5:302020-01-08T16:15:20+5:30

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ विविध कामगार संघटनांनी बुधवारी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये देशभरातील 25 कोटी कामगार सहभागी होत असल्याचा दावा केंद्रीय कामगार संघटनांनी केला आहे. मात्र बंदमधून रेल्वे व अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. आजच्या या भारत बंददरम्यान देशातील काही कामगार संघटनांनी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी पश्चिम बंगालमधील कंचरापारा येथे ट्रेन अडवल्या. तसेच, या बंदध्ये केंद्र व राज्य सरकार, सार्वजनिक बँका, विमा, पोर्ट ट्रस्ट, संरक्षण, बीपीसीएल, एचपीसीएल, बीएसएनएल, एमटीएनएल, पालिका, महापालिका कर्मचारी तसेच टॅक्सी, रिक्षा, मालवाहतूकदार, अंगणवाडी, आशा वर्कर्स, घरकामगार, माथाडी, बांधकाम कामगार सहभागी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :संपStrike