Aryan Khan Drug Case : आर्यनचा निरोप घेऊन कैदी बाहेर आला, सांगितली 'अंदर की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 08:57 PM2021-10-21T20:57:55+5:302021-10-21T21:19:42+5:30

काही कैद्यांनी बिस्कीटं खायला दिली. आर्यनने माझ्याजवळ निरोप दिला होता की, घरी जाऊन मला पैसे मनीऑर्डर करायला सांगा. मी त्यासाठी आर्यनच्या घरी गेलो होतो, पण मला तिथं काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याचं नाडार यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितलं.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे कुटुंब सध्या प्रचंड तणावाखाली आहे. कारण, 'मन्नत'चा राजकुमार सध्या तुरुंगात आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन खान ड्रग प्रकरणात अडकल्याने जवळपास गेल्या 17-18 दिवसांपासून कारागृहात आहे.

तो कारागृहात अस्वस्थ असल्याचेही बोलले जात आहे. गुरुवारी सकाळी शाहरुख खानने आर्थर रोड कारागृहात जाऊन त्याची भेट घेतली.

शाहरुख आणि गौरी खान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने आर्यनशी संवाद साधला होता. महाराष्ट्रात कोरोना प्रोटोकॉलमुळे, कैदी कुटुंबीयांना समोरासमोर भेटू शकत नव्हते.

परंतु 21 ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी या गाइडलाईनमध्ये सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे, शाहरुख खानने आज तुरुंगात जाऊन आर्यन खानची भेट घेतली.

आर्यन खानसोबत बराक 1 मध्ये असलेल्या कैद्याने आर्यनची परिस्थिती कथन केली आहे.

शारुखनने आर्यनची भेट घेण्यापूर्वी आर्यनसोबत तुरुंगात असलेल्या एका कैद्याने आर्यनचा निरोप घेऊन शाहरुखचा मन्नत बंगला गाठला होता.

शाहरुख खानच्या कुटुंबीयांनी त्यास दाद दिली नाही. त्यामुळे तो वापस फिरल्याचे त्याने सांगितले. श्रवण नाडार असं या कैद्याचं नाव असून ते आर्यनसोबत आर्थर रोड तुरुंगात होते.

आर्यन खानला तुरुंगात इतर कैद्यांप्रमाणेच ट्रीट केलं, व्हीआयपी ट्रीटमेंट अजिबात दिली नाही. कैद्यांसोबतच त्यालाही जेवण मिळतं, त्याकडे पैसे नसल्याने इतर कैदी त्याला मदत करायचे.

काही कैद्यांनी बिस्कीटं खायला दिली. आर्यनने माझ्याजवळ निरोप दिला होता की, घरी जाऊन मला पैसे मनीऑर्डर करायला सांगा. मी त्यासाठी आर्यनच्या घरी गेलो होतो, पण मला तिथं काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याचं नाडार यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितलं.

तुरुंगात आलेला नवीन माणूस रडतच असतो, जो नेहमीच ये-जा करतो, तोच रडत नाही. इतर नवीन येणारे रडतात, असे नाडार यांनी सांगितलं

Read in English