Gautam Gambhir यांचा Arvind Kejriwal यांच्यावर निशाणा; म्हणाले, "अयोध्येला जाऊन पापं धुण्याचे प्रयत्न"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 09:02 AM2021-10-27T09:02:20+5:302021-10-27T09:09:49+5:30

Gautam Gambhir on CM Arvind Kejriwal : गौतम गंभीर यांनी केजरीवाल यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर जोरदार निशाणा साधला.

भारतीय जनता पक्षाचे खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी मंगळवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya) निशाणा साधला.

केजरीवाल हे दुटप्पीपणाचं राजकारण करत असून राम जन्मभूमीवर पूजा करून ते आपले पापं धुण्याचे प्रयत्न करत असल्याचे गंभीर म्हणाले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांनी मंगळवारी रामजन्मभूमी स्थळी पूजा केली. तसंच दिल्ली सरकार मोफत तीर्थक्षेत्र योजनेत अयोध्येलाही सामील करणार असल्याचे ते म्हणाले.

"केजरीवाल आणि त्यांच्या अन्य लोकांनी निरनिराळ्या वेळी राम मंदिरावर कोणती वक्तव्ये केली आहेत हे सर्वांना माहित आहे. आता ते आयोध्येला जाऊन आपली पापं धुत आहेत," असं गंभीर म्हणाले.

"अरविंद केजरीवाल, राजकारणात ढोंगीपणा आणि दुटप्पीपणाचं दुसरं नाव आहे. काही प्रकारासात एमआयएम सारखे पक्ष केजरीवाल यांच्यापेक्षा चांगले आहेत. ते आपल्या सांप्रदायिक अजेंडा आणि कामाप्रती स्पष्ट आहेत," असं त्यांनी नमूद केलं.

दिल्लीत ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत तीर्थक्षेत्र योजनेत (Free Pilgrimage Scheme) अयोध्येला सामील करण्याची घोषणा मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.

दरम्यान, मंगळवारी केजरीवाल यांनी अयोध्ये राम जन्मभूमी मंदिरात (Ram Janmabhoomi Temple in Ayodhya) प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर हनुमान गढी येथेही गेले.

दिल्लीतील नागरिक मोफत अयोध्येला जाऊ शकतील आणि राम जन्मभूमीचं दर्शन घेऊ शकतील, असं दिल्ली सरकारद्वारे सांगण्यात आलं.

दिल्ली सरकार वातानुकुलित रेल्वे, वातानुकुलित हॉटेल आणि अन्य आवश्यक सुविधांची व्यवस्था करणार असल्याचंही सांगितलं. २०१९ मध्ये केजरीवाल सरकारनं सुरू केलेल्या या योजनेत ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना मोफत तीर्थक्षेत्र दर्शन करवण्यात येतं.

Read in English