जवानांनी सीमेवर साजरी केली दिवाळी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 08:27 PM2019-10-27T20:27:28+5:302019-10-27T20:32:18+5:30

देशभरात सध्या दिवाळीचा जल्लोष सुरू आहे. देशवासीयांना हा आनंद सुरक्षित वातावरणात साजरा करता यावा म्हणून हजारो जवान स्वत:च्या कुटुंबापासून दूर राहून सीमेवर पहारा देत आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या आणि निमलष्कराच्या विविध तैनात बटालियनच्या जवानांनी उत्साहात दीपोत्सव साजरा केला.

यावेळी जवानांनी एकमेकांना मिठाई भरवली आणि फटाकेही उडवले.

अटारी-वाघा सीमेजवळ सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी दिवाळी साजरी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग सहाव्यांदा जवानांसोबत दिवळी साजरी करण्यासाठी राजौरी येथे दाखल झाले आहेत.

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा पहिलाच सीमेलगतचा दौरा आहे.