इस्रोची आणखी एक गगनभरारी, GSAT-6A उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 11:24 AM2018-03-30T11:24:48+5:302018-03-30T11:24:48+5:30

श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून गुरूवारी जीएसएलव्ही-एफ०८ रॉकेटच्या साह्याने जीसॅट-६ ए (GSAT-6A) या दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

इस्रोच्या अभूतपूर्व यशामुळे लष्कराच्या सामर्थ्यात वाढ होणार असून, संपर्काचं जाळ विस्तारण्यासाठी याची मदत होणार आहे.

GSAT-6Aमुळे अतिदुर्गम भागात सेवा बजावत असलेल्या जवानांना दुस-या दूरच्या भागातील जवानांशी संपर्क साधणं सोपं होणार आहे. GSAT-6Aच्या प्रक्षेपणासाठी वापरण्यात आलेल्या जीएसएलव्हीत शक्तिशाली क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात आला आहे.

या इंजिनाचा चांद्रयान-२ मोहिमेतही वापर केला जाण्याची शक्यता आहे.

2066 किलो वजनाचा हा उपग्रह बनवण्यासाठी 270 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता.

या उपग्रहात एस-बँड कम्युनिकेशनसाठी ६ मीटर व्यासाचा अँटेना आहे. सोबतच सी-बँड फ्रिक्वेन्सीसाठी ०.८ मीटर व्यासाचा एक फिक्स अँटेना हब कम्युनिकेशनसाठी बसवण्यात आलेला आहे. या उपग्रहामुळे सॅटेलाइट मोबाइल कम्युनिकेशन उपकरणांची नेटवर्कची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे.