भारतातील ‘या’ ७ मंदिरात देवीला चढवला जातो मंच्युरियन, नूडल्सचा प्रसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 04:56 PM2018-04-04T16:56:52+5:302018-04-04T16:56:52+5:30

आपल्या मनात चांगले विचार आणि ईश्वराबद्दल भक्ती असेल तर आपल्याला सगळीकडे देवाचं वास्तव्य जाणवतं. भारतीय संस्कृतीत मंदिरात देवाला नैवेद्य दाखवण्याची जुनी परंपरा आहे. आरतीच्या वेळी अथवा भोजनाच्या वेळी देवाला पंचपक्वानांचा किंवा गोडधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. पण भारतात अशीही काही मंदिरे आहेत ज्या मंदिरांमध्ये देवाला मंच्युरियन, नूडल्स तसंच इतरही पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो.

१) बालसुब्रमनियम मंदिर, केरळ – बालसुब्रमनियम मंदिर हे केरळमधील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात प्रसाद म्हणून भक्तांना चॉकलेट दिलं जातं.

२) चायनीज काली मंदिर, कोलकाता – चायनीज काली मंदिरात चायनीज नूडल्स, मंच्युरियनचा काली देवीला प्रसाद दाखवला जातो.

३) अलागिर कोविल मंदिर, तामिळनाडू - तामिळनाडूतील या प्रसिद्ध मंदिरात देवाला नैवेद्य आणि भक्तांना प्रसाद म्हणून डोसा दिला जातो.

४) काल भैरव मंदिर, उज्जैन काल भैरव मंदिरात जगावेगळा प्रसाद दिला जातो. इथे काल भैरवाला मद्याचा प्रसाद नैवेद्य म्हणून दिला जातो.

५) करणीमाता मंदिर, राजस्थान - राजस्थानमधील या मंदिरात करणी देवी उंदिराच्या रूपात आहे, असा भक्तांचा समज आहे. म्हणून उंदिरांनी चाखलेले दूध भक्तांना प्रसाद म्हणून दिला जातो.

६) मुरूगन स्वामी मंदिर, तामिळनाडू – तामिळनाडूत मुरूगन स्वामी मंदिरात भक्तांची प्रचंड गर्दी असते. तसंच इथे प्रसाद म्हणून फळांचं मिश्रण असलेला जाम दिला जातो.

७) श्री परमहंस मंदिर ( मध्य प्रदेश) – श्री परमहंस मंदिरात भक्तांना बिस्किटांचा प्रसाद दिला जातो. मध्यप्रदेशातील परमहंस मंदिर इथल्या आगळ्यावेगळ्या प्रसाद वाटपासाठी प्रसिद्ध आहे.