अमेरिकेत नाही भारतात! कोरोनाने अख्खे कुटुंब संपवले; सहाव्याची मृत्यूशी झुंज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 08:15 PM2020-07-19T20:15:41+5:302020-07-19T20:24:02+5:30

काही महिन्यांपूर्वी अमेरिकेमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी आली होती. असाच प्रकार आता भारतात घडला आहे. झारखंडच्या कोळशाची राजधानी असलेल्या धनबादमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे.

काही महिन्यांपूर्वी अमेरिकेमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी आली होती. असाच प्रकार आता भारतात घडला आहे. झारखंडच्या कोळशाची राजधानी असलेल्या धनबादमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे.

कोरोना व्हायरमुळे एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला असून सहावा सदस्य हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. एक चूक या कुटुंबाच्या जिवावरे बेतली आहे.

कतरासच्या चौधरी कुटुंबासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांच्या घरातील 90 वर्षांची वृद्ध महिला दिल्लीला एका लग्नसोहळ्यासाठी गेली होती. तेथून परतताना तिची तब्येत खराब झाली. हॉस्पिटलमध्ये तिला कोरोना झाल्याचे समोर आले.

उपचारावेळी या महिलेने प्राण सोडले. 4 जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. इथून पुढे या कुटुंबावर कोरोनाचा कहरच सुरु झाला.

महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबाची कोरोना चाचणी करण्यात आली. तेव्हा तिचे दोन मुलगे कोरोना बाधित असल्याचे समोर आले. उपचारावेळी त्यांचाही मृत्यू झाला.

यानंतर त्यांचा आणखी एक भाऊ कोरोना बाधित झाला. चौथ्य़ाचा रिपोर्ट निगेटिव्ह होता. मात्र, त्यांचा कोरोनामुळे नाही तर आधीच तिघांचा कोरोनाने जीव घेतल्याने आलेल्या भीती आणि तणावामुळे मृत्यू झाला.

अशाप्रकारे एकाच कुटुंबाती पाच जणांचे आयुष्य अवघ्या 12 दिवसांत कोरोनाने संपविले. तर या महिलेचा पाचवा मुलगाही कोरोनाशी झुंज देत असून व्हेंटिलेटरवर आहे. त्याला रांचीच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.

वृद्धेच्या मृत्यूनंतर तिच्या आजुबाजुला राहणाऱ्या जवळपास 70 लोकांची चाचणी करण्यात आली आहे. महिलेच्या दोन मुलांना आधीपासूनच हृदयविकार आणि फुफ्फुसाचा आजार होता.

चौधरी कुटुंबातील एका मुलाचा मृत्यू हा धनबादच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये झाला. तर दुसऱ्याचा कोविड हॉस्पिटलमध्ये. तिसऱ्या मुलाचा मृत्यू हा रांचीच्या हॉस्पिटलमध्ये झाला.

चौथ्या मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, त्याला श्वास घेताना त्रास होत होता. त्याला जमशेदपूरच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे त्याचा मृत्यू झाला. तर महिलेचा सहावा मुलगा हा दिल्लीमध्ये आहे.

ही महिला दिल्लीतील तिच्या नातवाच्या लग्नाला गेली होती. महिलेची तब्येत प्रवासात असतानाच बिघडली. मात्र, तिच्यावर सामान्य पद्धतीने अंत्यसंस्कार केले गेले.

आयसीएमआरने सांगितलेल्या पद्धतीने अंत्यसंस्कार केले असते तर गावी असलेल्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाली नसती.