पश्चिम बंगालमध्ये बस दरीत कोसळली, 36 जणांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 01:10 PM2018-01-30T13:10:21+5:302018-01-30T13:23:49+5:30

कोलकाता : प्रवाशांनी गच्च भरलेली बस पुलावरून नदीत कोसळून किमान 36 जण बुडाल्याची घटना मुर्शिदाबाद जिल्ह्यात सोमवारी (29 जानेवारी) घडली. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी बसमध्ये 56 प्रवासी होते.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

अपघाताच्या ठिकाणी मदत आणि बचावकार्यात उशीर झाल्यामुळे संतप्त लोकांनी पोलिसांची गाडी पेटवून दिली.त्यामुळे पोलिसांना अश्रुधूराचा वापर करावा लागला. लोकांनी पोलिसांच्या गाड्याही जाळल्या आहेत.

काही प्रवाशांचा मृत्यू हा रुग्णालयात उपचारादरम्यान झाला आहे, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही बस शिक्रापूरहून मालदाकडे जात होती. अपघातावेळी जास्त करून लोक निद्राधीन होते. त्यामुळेच अनेकांचा मृत्यू झाला आहे.