राष्ट्रपिता महात्मा गांधींची 148 वी जयंती, पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 03:02 PM2017-10-02T15:02:59+5:302017-10-02T15:05:33+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली

'गांधींचे थोर विचार कोट्यवधी जनतेला प्रेरणा देणार आहेत', असेही ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही महात्मा गांधींना आदरांजली वाहिली

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजघाटावर सर्वपक्षीय नेत्यांनीही हजेरी लावली

सत्य आणि अहिंसा यांचे प्रेरणास्त्रोत अशी गांधीजींची ओळख असून आजचा हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो