जनता कर्फ्यु; एक नजर विदर्भातील छोट्या गावांवर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 01:02 PM2020-03-22T13:02:04+5:302020-03-22T13:07:56+5:30

: कोरोना विषाणूशी पुकारलेल्या लढ्यातले आतापर्यंतचे सर्वात मोठे अस्त्र जनता कर्फ्यु हे ठरले आहे. हे जनता शस्त्र जनतेने मोठ्या प्रमाणावर वापरल्याचे दिसून येते आहे. केवळ शहरातच नव्हे तर विदर्भातील खेडोपाडीही बंद हा तंतोतंत पाळला जात आहे. त्याची काही दृश्ये लोकमतच्या वाचकांसाठी देत आहोत.

वर्धा रेल्वे स्टेशनवर शुकशुकाट होता.

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा गावातले दृश्य

गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यात देसाईगंज या तालुक्यातील फवारा चौक असा निर्मनुष्य झाला होता.

चंद्रपूर जिल्ह्यातल्या जिवती गावात चिटपाखरूही बाहेर पडलेले नव्हते.

यवतमाळ जिल्ह्यातल्या विडूळ या लहानशा गावातही नागरिक घरबंद आंदोलनात सहभागी झाले होते.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील हा राष्ट्रीय महामार्ग ओसाड दिसत होता.

भंडारा जिल्ह्यात लाखांदूर-पवनी हा नेहमी गजबजलेला मार्ग सुनसान होता.