Ganesh Chaturthi 2018; विदर्भातील गणेश मंडळांची कलात्मकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 01:03 PM2018-09-18T13:03:30+5:302018-09-18T13:21:32+5:30

गडचिरोलीच्या अहेरीत तालुक्यात साकारला महिष्मती महल. अहेरी येथे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या राजमहालासमोर राज परिवाराचा मानाचा गणपती ‘अहेरीचा राजा’ स्थापित करण्यात आला आहे.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे असलेल्या विदर्भातील पहिल्या खुल्या कारागृहातील कैद्यांनी साकारले इको फ्रेंडली गणराया

भंडारा जिल्ह्यातील वरठीच्या झाडात अवतरले साक्षात गणेशजी. गावातील कलावंत रवी येळणे यांनी गावातील एका झाडातच गणेशमूर्ती साकारली.

नागपूरच्या अनंतनगर भागात नवयुवक गणेश उत्सव मंडळाने सादर केलेला पर्यावरणाचे महत्त्व सांगणारा देखावा.

यवतमाळच्या नेताजीनगरातील बाल गणेश उत्सव मंडळाने १७ वे वर्ष साजरे करताना साकारलेला देखावा लक्षणीय ठरला आहे. शंकर, पार्वतीची पाण्यासाठी धडपड आणि बाप्पांचा बालहट्ट या देखाव्यात उभा करण्यात आला आहे.