कार्निव्हलचा झगमगाट, विदेशी संगीताचा नजराणा, डोळ्यांचे पारणे फेडणारे फ्लोट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 10:47 PM2017-12-17T22:47:32+5:302017-12-17T22:51:04+5:30

‘वर्ल्ड ऑरेंज सिटी फेस्टिव्ह’लमध्ये रविवारी उपराजधानीत निघालेल्या कार्निव्हल परेडने नागपूरकरांचे लक्ष वेधले.

संगीताच्या विविध वाद्यांचे दर्शन घडविणारा कॅन्डफ्लॉस फ्लोट आणि त्यावर चिमुकल्यांना चॉकलेट वाटणा-या रशियन गर्ल्सने सर्वांना आकर्षित केले. आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये नेहमीच पाहावयास मिळणारा वन आय फ्लोट नागपूरच्या कार्निव्हलमध्येही नागपूरकरांनी अनुभवला

वेस्ट हायकोर्ट रोड ते लॉ कॉलेज रोडपर्यंत निघालेल्या कार्निव्हल परेडमध्ये एकूण १६ चित्ररथ सहभागी झाले होते. कार्निव्हलचा अनुभव अनेकांनी गोव्यात किंवा विदेशात घेतला असेल

परंतु नागपुरात हा उत्सव सुरू असल्याने मार्गात रस्त्याच्या दुतर्फा नागपूरकरांनी प्रचंड गर्दी केली होती.

कार्निव्हलची दृश्य अनेकांनी कॅमेराबद्ध केली. आकर्षक चित्ररथांसोबत अनेकांनी सेल्फी काढून घेतल्या.

विदेशी नृत्यावर रशियन तरुणीच नव्हे तर नागपूरकर रसिकांनीही ठेका धरला होता.