कोलकाता फिरायला जाताय, मग हे खा अन् ते पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 03:36 PM2019-06-17T15:36:08+5:302019-06-17T15:42:50+5:30

कोलकाताच्या मार्केटमध्ये तुम्हाला बाम्बू, ज्यूट आणि पुटूलपासून बनविण्यात आलेले प्रोडक्ट खरेदी करता येतील.

कोलकाता फिरायला गेल्यानंतर तेथील प्रसिद्ध रोसगुल्ला तर बनतोच बॉस. येथील संदेश रसगुल्ला फेमस आहे.

कोलकात्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन आणि आकर्षक बांगड्याही खरेदी करता येतील. येथील बांगड्या जगप्रसिद्ध असून बहुतांश चित्रपटात अभिनेत्रींच्या पोशाखात येथील कोंच शेल बांगड्या दिसतात.

कालीघाटच्या भन्नाट पेटींग्ज तुमचं लक्ष वेधून घेतात. येथील पेंटीग्जमध्ये देवी-देवतांची चित्रे पाहायला मिळतात. अमेरिका आणि युरोपमध्ये या पेंटीग्ज प्रसिद्ध आहेत.

आता कोलकाता येथे जाऊन तेथील साडी नाही विकत घेतली तर मग तुमची शॉपिंग अपूर्णच. येथील साड्या म्हणजे स्त्रीच्या सुंदरतेवर साज चढविणारा पोशाख.

क्रिएटीव्हिटीमध्ये बंगालला तोडच नाही. मिस्टीकल क्राफ्टच्या सुंदर कलाकृती तुम्हाला आकर्षित करतात. भिंतीवर अडकविण्यासाठी या टेबलवर ठेवण्यासाठी कलाकृती उत्तमच.

शोलापीठ हँडीक्राफ्टसाठीही हे शहर प्रसिद्ध आहे, दुर्गापूजेसाठी बनविण्यात येणाऱ्या सुंदर मुर्ती आणि पंडाल हे येथील खासियत आहे.

भारतीय व्यक्ती जगभरात कुठेही जाऊ देत, तेथील चहा प्यायलाच पाहिजे. कोलकाता फिरायला गेल्यावर दार्जिलिंग टी चा स्वाद घ्यायलाच पाहिजे.

टेराकोटा झुंबर आणि लघुमूर्तींची खरेदी करण्यासाठी बनकरा आणि बिष्णुपूरू हे प्रसिद्ध ठिकाण आहे. घरावरील छतावर लावल्यानंतर हे टेरोकाटा घराची शोभा वाढवते.