'सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या मुस्काटात सणसणीत चपराक मारली'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 08:29 PM2020-11-11T20:29:51+5:302020-11-11T20:39:32+5:30

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. गोस्वामी यांना न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच त्यांची तळोजा कारागृहातून सुटका केली.

स्वामी यांच्यासोबतच प्रकरणातल्या आणखी दोन आरोपींनादेखील जामीन मंजूर झाला आहे. गोस्वामी यांनी दिलासा नाकारणं ही मुंबई उच्च न्यायालयाची चूक होती, असं महत्त्वपूर्ण विधान सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान केलं.

अर्णब यांच्या सुटकेनंतर भाजपा नेत्यांसह समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे. तर, अभिनेत्री कंगना राणौतलाही अत्यानंद झालाय.

भाजपा नेते आमदार राम कदम यांनी चक्का होम हवन करुन अर्णब यांच्या सुटकेसाठी पूजा केली. अखेर आज अर्णब यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

राम कदम यांनी यापूर्वही अर्णब यांच्या सुटकेसाठी मुंबईतील उच्च न्यायालयाबाहेर आणि हुतात्म चौकात आंदोलन केले होते

गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही भेट घेत अर्णब यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात राम कदम यांनी तक्रार केली होती. तसेच, पोलिसांवर कारवाईची मागणही केली होती.

राम कदम यांनी अर्णब गोस्वामींच्या अटकेपासून राज्य सराकरविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं.

सर्वोच्च न्यायालयाने आज अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर केल्यानंतर, राम कदम यांनी ट्विट करुन महाराष्ट्र सरकारला सणसणीत चपराक लावल्याचं म्हटलं आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने देशाची माफी मागावी, अशी मागणीही राम कदम यांनी केली आहे.

इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली होती. नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत गोस्वामींचं नाव होतं. त्यामुळे रायगड पोलिसांनी त्यांना अटक केली.

यानंतर गोस्वामींनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला. मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आज या प्रकरणी सकाळी साडे दहापासून सुनावणीस सुरुवात झाली. न्यायालयात ज्येष्ठ वकील हरीश साळवेंनी अर्णब यांची बाजू मांडली.